मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /प्रांतविधीसाठी बाहेर पडले, मात्र पुन्हा घरी परतलेच नाही; धक्कादायक घटनेनं औरंगाबाद हादरलं

प्रांतविधीसाठी बाहेर पडले, मात्र पुन्हा घरी परतलेच नाही; धक्कादायक घटनेनं औरंगाबाद हादरलं

आसाराम आठे हे नेहमीप्रमाणे प्रांतविधीसाठी गावातील ओढ्याच्या कडेला गेले होते. याचवेळी ही घटना घडली.

आसाराम आठे हे नेहमीप्रमाणे प्रांतविधीसाठी गावातील ओढ्याच्या कडेला गेले होते. याचवेळी ही घटना घडली.

आसाराम आठे हे नेहमीप्रमाणे प्रांतविधीसाठी गावातील ओढ्याच्या कडेला गेले होते. याचवेळी ही घटना घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 14 जानेवारी, अविनाश कानडजे : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीला कंटाळून आणखी एका शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं आहे. आसाराम विश्वनाथ आठे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ते पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील रहिवासी आहेत. आसाराम आठे हे गावाजवळच असलेल्या ओढ्याच्या कडेला प्रांतविधीसाठी गेले होते, मात्र ते घरी परतलेच नाहीत. त्यांनी तिथेच एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त होत आहे.

  बँकेचं कर्ज  

आसाराम आठे यांच्या मालकीची  कुतुबखेडा येथे साडेसहा एकर शेती आहे. शेतामध्ये कपाशी तूर आणि काही प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर बँक ऑफ बडोदा आणि महिंद्रा फायनान्स या बँकांचे कर्ज होते. मात्र  सततच्या नापिकीमुळे हे कर्ज त्यांना फेडता येत नव्हते. त्यातच यंदा शेतातील मालाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. कपाशी आणि तुरीचं पीक हातचं गेलं. त्यामुळे हे कर्ज फेडायचं कसं या विवंचनेत ते होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाकडून देण्यात आली आहे.

गळफास लावून आत्महत्या  

दरम्यान आसाराम आठे हे नेहमीप्रमाणे प्रांतविधीसाठी गावातील ओढ्याच्या कडेला गेले होते. मात्र ते घरी परतलेच नाही. त्यांनी तिथेच असलेल्या एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. साठे यांनी कर्जबाजारी आणि सततच्या नापिकीला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime