मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'मैं हूँ डॉन'! राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान शिवसेना आमदाराचा लग्नात भन्नाट डान्स; पाहा VIDEO

'मैं हूँ डॉन'! राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान शिवसेना आमदाराचा लग्नात भन्नाट डान्स; पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत डान्स करताना दिसत आहे. उदयसिंग राजपूत यांनी रविवारी एका लग्न समारंभात डीजेवर मै हू डॉन या गाण्यावर ठेका धरला.

औरंगाबाद 27 जून : सध्या राज्यात मोठा सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) सुरू आहे. शिवसेनेचे अनेक आमदार सध्या बंड पुकारून एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Faction) सामील झाले आहेत. याशिवाय अनेक अपक्ष आमदारही सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या तणावाचं वातावरण आहे. अशात आता शिवसेना आमदाराचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत डान्स करताना दिसत आहे. उदयसिंग राजपूत यांनी रविवारी एका लग्न समारंभात डीजेवर मै हू डॉन या गाण्यावर ठेका धरला. एकीकडे राज्यात सत्ता नाट्य चालू असताना दुसरीकडे शिवसेना आमदाराने भन्नाट डान्स केला आहे. त्यामुळे या डान्सची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान कालच उदयसिंग यांनी असा आरोप केला होता, की गटाने मला विकत घेण्याचा प्रयत्न केला. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्यासाठी मला 50 कोटींची ऑफर होती, असा दावा कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी केला आहे. तसंच मला शंभर कोटी रुपये दिले तरी मी शिवसेनेसोबत गद्दारी करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. माझ्याकडे फॉर्च्युनर कारमधून पैसे आले होते. त्याचे पुरावेदेखील माझ्याकडे आहेत, असं ते म्हणाले.

माझ्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं कैद झालं आहे. मला पैसे देवून खरेदी करण्यासाठी दोन गाड्या आल्या होत्या, असं त्यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्याबाबत कोणतीही गद्दारी केली नाही आणि करणार नाही, असंही ते म्हणाले.

First published:

Tags: Mla, Shivsena, Video viral