औरंगाबाद, 12 जानेवारी: सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर चोरटे विविध पद्धतींचा अवलंब करत असतात. नागरिकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आमिषाला (Cyber crime) बळी पडू नये, असं आवाहन सतत पोलिसांकडून केलं जातं. असं असूनही अनेकजण सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडतात. अशीच एक घटना औरंगाबादेत (Aurangabad) घडली आहे. औरंगाबाद शहरात अंदाजे 1400 हून अधिक जणांची लाखोंची फसवणूक (Money fraud with 1400 people) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे.
तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर पोलीस (Cyber police) या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागरिकांना काही दिवसांपूर्वी त्याच्या मोबाइलवर एक लिंक पाठवण्यात आली होती. संबंधित लिंक ओपन करताच त्यांना एक अॅप त्यांच्या फोनमध्ये इन्स्टॉल करायला सांगितलं जात होतं. त्यानंतर संबंधित अॅपवरून अभासी यंत्र खरेदी करा आणि लाखोंचा परतावा मिळवा, असं आमिष देण्यात आलं होतं.
हेही वाचा-डेटिंग अॅपवरचा डॉक्टर निघाला भामटा, पुण्यातील उच्चशिक्षित महिलेला लाखोंचा गंडा
संबंधित यंत्र प्रत्यक्षात मिळणार नव्हतं, मात्र या यंत्रात गुंतवणूक केल्यास दररोज ठरावीक रक्कम बँक खात्यात जमा केली जाईल, असं आमिष देण्यात आलं होतं. त्यामुळे शहरातील जवळपास 1400 जणांनी यामध्ये गुंतवणूक केली होती. संबंधित सर्वांना सुरुवातीचे काही दिवस ठरावीक रक्कम मिळत गेली. रक्कम मिळत असल्याने विश्वास बसल्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. अशात 10 जानेवारी रोजी हे अॅप अचानक बंद पडलं आहे. या अॅपचं नाव केएनसी आहे.
हेही वाचा-Mumbai:'लिव्ह इन पार्टनर'च्या बाळाचा 5 लाखात केला सौदा, कथित बापासह 11जणांना अटक
हे अॅप बंद पडल्याने नागरिकांना पैसे मिळणं बंद झालं. यानंतर अनेकांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Crime news, Money fraud