मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'थांब, तुझे फोटो काढतो', म्हणत विहिरीच्या काठावर केलं उभं; औरंगाबादेतील तरुणाला दिला भयंकर मृत्यू

'थांब, तुझे फोटो काढतो', म्हणत विहिरीच्या काठावर केलं उभं; औरंगाबादेतील तरुणाला दिला भयंकर मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Murder in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला फोटो काढण्याच्या बहाण्यानं विहिरीच्या काठावर उभं करून आरोपीनं त्याला भयंकर मृत्यू दिला आहे.

वाळूज, 10 डिसेंबर: औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या (minor boy brutal murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलाला आरोपीनं फोटो काढण्याच्या बहाण्यानं विहिरीच्या काठावर उभं करून भयंकर मृत्यू दिला आहे. आरोपीनं संबंधित मुलाला विहिरीत ढकलून देत त्याच्या डोक्यात दगड घातला (Push into well and hits with stone) आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे. आरोपीनं खुनाची कबुली दिली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

अंकुश प्रल्हाद म्हैसमाळे असं हत्या झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचं नाव असून तो वाळूज परिसरातील शेंदुरवाडा येथील रहिवासी आहे. मृत अंकुश हा 30 नोव्हेंबर रोजी अचानक बेपत्ता झाला होता. मुलगा बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. नातेवाईकांनीच त्याचं अपहरण केलं असावं, असं संशय कुटुंबीयांना आला. त्यामुळे त्यांनी 2 डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.

हेही वाचा-टेपरेकॉर्डरच्या आवाजावरुन वाद, मुंबईत तरुणानं केला शेजारच्याचा गेम खल्लास

या घटनेचा तपास सुरू असताना 5 डिसेंबर रोजी ढोरकीन -बालानगर रस्त्यावरील एका विहिरीत एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन पैठण एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी ठेवण्यात आलेला मृतदेह आपल्याच मुलाचा असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. पण यावेळी अंकुशचा मोबाइल सापडला नसल्याने पोलिसांनी सखोल तपास केला. यावेळी मृत अंकुशच्या मामेभावाकडे अंकुशचा मोबाइल सापडला.

हेही वाचा-संतापजनक! अल्पवयीन मुलीचे कपडे उतरवून मारहाण, नग्न व्हिडीओ काढला, मुंबईतील घटना

पोलिसांनी आरोपीला मामेभावाला ताब्यात घेत. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली आहे. अंकुशकडील मोबाइल आपल्याला हवा असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. आरोपीनं अंकुशला पार्टी देण्याच्या बहाण्यानं विहिरीजवळ बोलावून घेतलं होतं. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं 'तुझे फोटो काढतो' म्हणत अंकुशला विहिरीच्या काठावर उभं केलं होतं. यावेळी बेसावध असणाऱ्या अंकुशला आरोपीनं जोरदार धक्का दिला. अंकुश विहिरीत पडल्यानंतर आरोपीनं भलामोठा दगड अंकुशच्या डोक्यात घालून त्याची निर्घृण हत्या केली आहे. यानंतर आरोपी मोबाइल घेऊन फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Aurangabad, Crime news, Murder