Home /News /maharashtra /

औरंगाबादमध्ये हॉटेलच्या रुममध्ये प्रेमीयुगुल आढळलं धक्कादायक अवस्थेत! 29 जुलैपासून होतं वास्तव्य

औरंगाबादमध्ये हॉटेलच्या रुममध्ये प्रेमीयुगुल आढळलं धक्कादायक अवस्थेत! 29 जुलैपासून होतं वास्तव्य

औरंगाबाद शहरातील एका हॉटेलच्या रुममध्ये एक प्रेमीयुगुल मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

    अविनाश कानडजे, औरंगाबाद, प्रतिनिधी औरंगाबाद, 3 ऑगस्ट : आपल्याकडे अजूनही प्रेमविवाहांना समाजमान्यता मिळालेली नाही. त्यामुळे अनेकदा घरच्यांच्या विरोधात प्रेमीयुगुल पळून जाऊन लग्न करतात. किंवा मग तेही जमलं नाही तर टोकाचं पाऊलही उचलतात. कधीकधी मुला-मुलीच्या घरच्यांकडूनही घातपात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना औरंगाबादमधून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील एका हॉटेलमधील लॉजवर एक प्रेमीयुगुल मृत अवस्थेत आढळलं आहे. या प्रकरणी पोलीस विभाग तपास करत आहे. काय आहे प्रकरण? औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल पंजाबमधील लॉजमध्ये एक प्रेमीयुगुल एकाच रुममध्ये थांबलेले होते. 29 जुलैपासून दोघेही हॉटेलमध्ये थांबले होते. आज सकाळी हॉटेलच्या रूममध्ये दोघेही बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये तपासासाठी हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सागर राजेंद्र बावणे असे मुलाचे नाव असून तो शहरातीलच सिडको भागातील रहिवासी आहे. तर सपना अंकुश खंदारे असे मुलीचे नाव असून ती शहरातील मुकुंदवाडी भागातील राहणारी आहे. या दोघांनी आपले जीवन का संपवले हे अजून अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे. वेदांत नगर पोलीस पुढील तपास करत आहेत. सोशल मीडियावर प्रेम नंतर धोका, मुलीची तीनवेळा विक्री; कशी फुटली अत्याचाराला वाचा आत्महत्या की इतर काही कारण? हे दोघेजण मृतअवस्थेत आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दोघांनी आत्महत्या केली की इतर कोणत्या कारणामुळे त्यांचा जीव गेला याबद्दल माहिती समजली नाही. हॉटेलच्या रुमवर कोणत्याही प्रकारची चिठ्ठी किंवा माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्या दृष्टीनेही पोलीस विभाग तपास करत आहे. दोघांचेही शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे मृत्यूचे कारण समोर येऊ शकते. पण, तोपर्यंत रुममध्ये मिळालेल्या इतर गोष्टींवरुनही पुढील तपास सुरू आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Aurangabad, Crime

    पुढील बातम्या