Home /News /maharashtra /

'मुख्यमंत्री ठाकरेंनी चांगले मुद्दे मांडले', MIM चे खासदार जलील यांनी केलं कौतुक, म्हणाले...

'मुख्यमंत्री ठाकरेंनी चांगले मुद्दे मांडले', MIM चे खासदार जलील यांनी केलं कौतुक, म्हणाले...


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले मुद्दे मांडले. त्यांचं स्वागत आहे.  इस्लाम धर्माचा द्वेष करत नाही याचं स्वागत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले मुद्दे मांडले. त्यांचं स्वागत आहे. इस्लाम धर्माचा द्वेष करत नाही याचं स्वागत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले मुद्दे मांडले. त्यांचं स्वागत आहे. इस्लाम धर्माचा द्वेष करत नाही याचं स्वागत आहे.

    औरंगाबाद, 08 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (cm uddhav thackery Speech at aurangabad)चांगले मुद्दे मांडले. त्यांचं स्वागत आहे.  इस्लाम धर्माचा द्वेष करत नाही याचं स्वागत आहे. इस्लाम मुद्द्यावर भारताने माफी मागण्याची गरज नाही' असं म्हणत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचं कौतुक केलं आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विराट अशी सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी नुपुर शर्मा यांच्या वक्तव्यापासून ते ज्ञानवापी मशिदीपर्यंत जोरदार टीका केली. त्यांच्या या सभेतील भूमिकेबाबत इम्तियाज यांनी समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले मुद्दे मांडले. त्यांचं स्वागत आहे.  इस्लाम धर्माचा द्वेष करत नाही याचं स्वागत आहे. इस्लाम मुद्द्यावर भारताने माफी मागण्याची गरज नाही. पण बाबरी पडून ३० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले, मग पुन्हा पुन्हा बाबरी का? त्यापेक्षा विकासावर बोलले असते तर बरं झालं असतं, असं इम्तियाज जलील म्हणाले. (Daily Horoscope : चांगलं सरप्राइझ मिळणार पण एका गोष्टीची काळजी मात्र नक्की घ्या) तसंच, या सभेतून येणाऱ्या २ - ३ वर्षात औरंगाबादला पाणी मिळणार नाही, हे स्पष्ट झालं. पालकमंत्री कोणता मोठा उद्योग आणणार, हे देखील स्पष्ट केलं असत तर बरं झालं असतं. पाणी योजनेसाठी किती पैसे दिले हे महत्त्वाचे नाही, पाणी कधी मिळणार हे महत्त्वाचे आहे, मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा होती, असंही जलील म्हणाले. औरंगाबादला मेट्रोची गरज नाही, उड्डाणपुलाची गरज आहे. मुख्यमंत्र्यांच्या रोख भाजप आणि राज ठाकरेंवर होता. औरंगाबादचा विकास झाल्यानंतर नामांतराचा विषय पाहू असं मुख्यमंत्री म्हणाले याचं स्वागत आहे. औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महारजांचं नाव देण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, असंही जलील म्हणाले. सुभाष देसाई भाषणात शहराच्या पाणी पुरवठ्याबद्दल खोटं बोलले. कितीही प्रयत्न केले तरी औरंगाबादला पाणी मिळण्यासाठी ३ ते ४ वर्षे लागतील.  टीका करताना मुद्दे लागतात. इम्तियाज जलील काय चुकीचे काम करतात, हे शोधून देखील सापडल नसेल. त्यामुळे बहुतेक आमच्यावर टीका केली नसेल, असंही जलील म्हणाले. राज्यसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत महविकास आघाडी, भाजप वा अन्य कुणीही संपर्क केला नाही. तुम्ही आले संपर्क केला तर विचार करू, आम्ही वाट पाहू. मतदान करतांना आमच्या अटी आहेत. एमआयएम उमेदवारांच्या मतदारसंघात विकास होणार असेल, तिथल्या लोकांचं भल होणार असेल तर आम्ही तडजोड करण्यासाठी तयार आहोत, अशी ऑफरच जलील यांनी महाविकास आघाडीला दिली. भाजपला mim चं उत्तर माहीत आहे, त्यामुळे ते आमच्याकडे आले नसावेत, असा टोलाही जलील यांनी लगावला. काय म्हणाले उद्धव ठाकरे? 'आज एका भाजपच्या प्रवक्त्याने प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला. काय संबंध होता. आपल्या देवदैवतांचा कुणी अपमान करायचा नाही, असं वाटत आहे. तसंच त्यांनाही वाटत असेल. तो अपमान केला नंतर सर्व अरब देश एकत्र आले आणि पंतप्रधानांना माफी  मागायला लावली. राजकीय मतभिन्नता असेल. पण, पंतप्रधान हे देशांचे आहे. त्यांचा फोटो कचरा कुंडीवर लावला जात आहे.  कुणामुळे ही परिस्थिती आली आहे, त्यांच्यामुळे देशाने का माफी मागायची, देशाने काय केलं. गुन्हा केला आहे. तो भाजपने केला आहे. भाजपच्या तीनपाट प्रवक्त्याने केला आहे. भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही. भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही' असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. 'तुम्हाला काय निवडायचे ते निवडा, भाजपच्या तीनपाट प्रवक्त्यामुळे देशाच्या पंतप्रधानाचा फोटो कचरा कुंडीवर लावला जातो. गुन्हा भाजपच्या प्रवक्त्याने केलेला आहे. ते देशाचे प्रवक्ते नाही. भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही. भाजपच्या तीनपाट प्रवक्त्यामुळे देशावर जी नामुष्की ओढावली ते तुम्हाला मान्य आहे का? अशी प्रवृती असेल आणि आम्ही तुमच्या मागे यायचं हे, अजिबात होणार नाही' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. (IIFA नंतरचा सईचा पार्टी लुक चर्चेत; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव, म्हणाले...) 'बाळासाहेबांनी कधीही इस्लाम किंवा मुस्लिमांवर बोलताना मुसलमान म्हणून द्वेष करा, असं सांगितलेलं नाही. तसं ते सांगूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज कुराण सापडल्यानंतरही जपून ठेवत होते त्या शिवरायांचे संस्कार आमच्यात आहेत. आम्ही द्वेष करत नाही. प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवायचा. घराबाहेर पडतो तेव्हा देश हाच माझा धर्म मानावा. पण दुर्देवाने कुणी त्याच्या धर्माच्या नावाने आमच्या अंगावर आला तर आम्ही या देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या देवदेवतांचा अपमान कुणी करु नये तसं त्यांचंही कुणी करु नये' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या