सुशील राऊत,प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर 3 मार्च : होळी आणि धुलिवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. होळी आणि धुलीवंदनाचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामुळे होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर नशा करून वाहन चालवणे, हुल्लडबाजी करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांवर आता छत्रपती संभाजीनगर पोलिसातर्फे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली आहे.
होळी सण साजरा करत असताना अनेक तरुण नशा करत असतात. त्यासोबतच दुचाकी चालवत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासोबतच रंग खेळताना हुल्लाडबाजी करतात. तसेच रंग न खेळणाऱ्या नागरिकांवरती बळजबरीने रंग फेकला जातो. यातून वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
Holi 2023 : यंदा रंगपंचमीला घरीच बनवा नैसर्गिक रंग, पाहा काय आहे पद्धत? Video
होळी आणि धुलिवंदन हा सण आपल्याकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येकाने हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा. मात्र, या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी याचं भान राखणे गरजेचे आहे. सण साजरा करत असताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असं आवाहन डॉ.निखिल गुप्ता यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Holi 2023, Local18