मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चालत्या बसमध्ये गाव शिकत आहे संगणक, पाहा काय आहे नवी युक्ती, Video

चालत्या बसमध्ये गाव शिकत आहे संगणक, पाहा काय आहे नवी युक्ती, Video

X
ही

ही बस प्रत्येक गावामध्ये जाऊन विद्यार्थी आणि नागरिकांना संगणकाचे शिक्षण देण्याचे काम करत आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये आता विद्यार्थी आणि नागरिक सहजपणे संगणक हाताळत आहेत.

ही बस प्रत्येक गावामध्ये जाऊन विद्यार्थी आणि नागरिकांना संगणकाचे शिक्षण देण्याचे काम करत आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये आता विद्यार्थी आणि नागरिक सहजपणे संगणक हाताळत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

    सुशील राऊत,प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर, 06 मार्च : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजही अनेक ग्रामीण भागांमध्ये संगणकाची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे इच्छा असतानाही अनेक विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना संगणक शिकता येत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन एका खाजगी कंपनीने एका बसमध्ये संगणकासह अद्यावत साहित्य उपलब्ध करून दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही बस प्रत्येक गावामध्ये जाऊन विद्यार्थी आणि नागरिकांना संगणकाचे शिक्षण देण्याचे काम करत आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये आता विद्यार्थी आणि नागरिक सहजपणे संगणक हाताळत आहेत.

    कशी झाली सुरुवात?

    छत्रपती संभाजीनगर येथील इंड्यूरन्स कंपनीच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना संगणक शिकता यावे यासाठी तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एका बसमध्ये संगणकासह एलईडी टीव्ही यासह वेगवेगळे साहित्य बसवले. ही बस प्रत्येक गावामध्ये जाऊन विद्यार्थी आणि नागरिकांना संगणकाचे शिक्षण देण्याचे काम करत आहे.

    कसा आहे अभ्यासक्रम?

    एकाच वेळी विद्यार्थ्यांची बॅच भरवली जाते. एका बॅचचा कालावधी एक महिन्याचा असतो. यामुळे दिवसभरामध्ये शंभर विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. यात पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी ॲनिमेशन स्वरूपात अभ्यासक्रम डिझाईन करण्यात आला आहे. तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक ऑफ आयटी असा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात आला आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ॲडव्हान्स लेव्हलचे कोर्स शिकवले जातात.  महिलांना महिला बचत गटा संबंधी तर शेतकऱ्यांना ऑनलाइन कामकाज करण्याबाबत शिक्षित केले जात आहे, असं इंड्यूरन्स कंपनीचे कर्मचारी लक्ष्मण सातपुते यांनी सांगितले. 

    मला संगणकाचे ज्ञान मिळाले

    माझं बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर मला संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी एमएससीआयटी करायची होती. मात्र, गावामध्ये तशी सुविधा उपलब्ध नव्हती. गावापासून पाच किलोमीटर असलेल्या गावामध्ये जाऊन संगणकाचा कोर्स करावा लागणार होता. यामुळे घरातून परवानगी मिळणं कठीण होतं. मात्र, इंड्यूरन्स कंपनीच्या माध्यमातून गावामध्ये बस आली आणि यामुळे मला संगणकाचे ज्ञान मिळाले, असं विद्यार्थीनी सबुरी कच्छवा हिने सांगितले.

    Solapur News: सापशिडीतून शिकवलं गणित, कल्पक शिक्षकाला मिळाला मोठा पुरस्कार! Video

    या उपक्रमाचा फायदा 

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञानाची अत्यंत गरज असते. यासोबतच विद्यार्थ्यांना शाळेबद्दल गोडी निर्माण व्हावी. यासाठी इंड्यूरन्स कंपनीच्या या बसचा फायदा होत आहे. विद्यार्थ्यांना टीव्हीच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टीतून शिक्षण मिळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या उपक्रमाचा ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नागरिकांना लाभ होत आहे, असं शिक्षक विपिन विसपुते यांनी सांगितले.

    First published:

    Tags: Aurangabad, Education, Local18