अविनाश सुभाष कानडजे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : आपली एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते याचं उदाहरण देणारी घटना समोर आली आहे. कोरोनानंतर बऱ्यापैकी सगळे व्यवहार हे डिजिटल झाले आहेत. हातात पैसे कमी आणि गुगल पे, फोन पे किंवा ऑनलाईन पेमेंट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यासोबत फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत.
हॅकर्स वेगवेगळ्या युक्त्या वापरून तुमच्या मेहनतीच्या पैशांवर डल्ला मारायला तयारच आहेत. बस्स तुमची एक चूक जर झाली तर तुमचे सगळे पैसे खात्यातून जाऊ शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. OTP दिल्याने सव्वा पाच लाख रुपये खात्यातून गायब झाले.
नेमकं काय घडलं?
अद्यात व्यक्तीने मोबाईलमध्ये दोन ॲप इन्स्टॉल करायला सांगून ओटीपी विचारुन बँक खात्यातील 5 लाख 16 हजार रुपये काढून घेतल्याची घटना वाळूजमध्ये घडली आहे. दिनेश हिरालाल अग्रवाल असे फसवणुक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
बायकोवर संशय आला त्याने घरात बोलावलं अन्.. निघृण हत्येनं नागपूर हादरलं
अज्ञात आरोपीने त्याच्या मोबाईलवरून अग्रवाल यांच्या फोन करुन त्यांच्या मोबाईलवर Anydesk व Aplemix हे अँप डाउनलोड करण्याचे सांगून त्यांच्या बँक डिटेल आणि फोन पे डिटेल ओटीपी घेवुन सेंट्रल बँकेच्या अकाउंट मधुन दि 3 मार्च ते 4 मार्च दरम्यान 5 लाख 16 हजार 493 रुपये ऑनलाइन काढून घेत फसवणुक केली.
याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता ते गेलेले पैसे पुन्हा मिळतील की नाही याबाबत सध्या तरी काहीच सांगू शकत नाही. तुमच्यासोबतही असे प्रकार घडू नयेत यासाठी तुम्ही काही गोष्टी पाळणं अत्यावश्यक आहे.
8 मुलांची आई, अनैतिक संबंध.. नंतर एका वयस्काचा खून, नंतर आरोपीला जे कळलं त्याने तोच हादरला
कोणत्या गोष्टींची घ्याल काळजी?
अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज किंवा लिंकवर क्लीक करू नका
गुगलवर कोणताही नंबर शोधून त्यावर फोन करून तुमची माहिती देऊ नका
तुम्हाला कोणी OTP मागितला तर तुम्ही कोणालाही शेअर करू नका
तुमच्या फोन पे गुगल पेचे पासवर्ड बदलत राहा
एनी डेस्क किंवा अशा प्रकारचे कोणतेही अॅप फोनमध्ये डाऊनलोड करू नका
तुम्हाला अनोळखी नंबरवरून फोन आले तर त्यांना तुमची कोणतीही माहिती देऊ नका
तुमचा CVV नंबर, कार्ड नंबर, आधार नंबर, पॅन नंबर, बँकेचे डिटेल्स किंवा OTP काहीच कोणालाच कुठेच ना सोशल मीडिया ना फोन कुठेही कोणतीही गोष्ट शेअर करू नका.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पासवर्ड गुगल क्रोमवर सेव्ह करू नका. ते सतत बदलत राहा त्यामुळे हॅकर्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.