मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शाळा सुरू करण्यासाठी फुले-आंबेडकर-कर्मवीरांनी भीक मागितली', चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त विधान

'शाळा सुरू करण्यासाठी फुले-आंबेडकर-कर्मवीरांनी भीक मागितली', चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त विधान

गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. यामध्ये आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही उडी घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. यामध्ये आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही उडी घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. यामध्ये आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही उडी घेतली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Shreyas

औरंगाबाद, 9 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. यामध्ये आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही उडी घेतली आहे. शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. 'महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,' असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

औरंगाबादच्या पैठण संतपीठच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. 'या देशात शाळा कुणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या, बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केल्या. महात्मा फुलेंनी केल्या. या शाळा सुरू करताना गर्व्हनमेंटने त्यांना अनुदान दिलं नाही, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करतोय पैसे द्या,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका व्हायला लागली आहे. 'भाजपमध्ये गेल्या 8 दिवसांपासून सातत्याने महापुरुषांची बदनामी करण्याची वाचाळवीरांची प्रदीर्घ परंपरा लागली आहे. चंद्रकांत पाटील यांनी यात आणखी भर घातली आहे. या महामानवांनी लोकवर्गणीतून शाळा आणि शिक्षण संस्था उभ्या केल्या. भाजप नेत्यांच्या मस्तकातली घाण साफ करायला गाडगे महाराजांचा झाडूच घ्यावा लागेल,' अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान सातत्याने भाजपचे नेते करत आहेत. भीक मागण्याची जी शब्दावली भाजपने केली आहे, ती अत्यंत चुकीची आहे. इंग्रजांच्या काळात अनुदानाची व्यवस्था नसल्याने गोरगरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी दान स्वरूपात मागणी करण्यात यायची, त्याला भीक मागणं म्हणत नाहीत,' असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

'भाजपचे नेते मुद्दाम महापुरुषांचा अपमान करत आहेत. भाजपचे नेते बहुजनांचाही आणि बहुजन चळवळीतल्या इतिहासाचाही अपमान करत आहेत. इतिहास माहिती नसताना इतिहासावर बोलणं योग्य नाही, आधी इतिहास वाचावा नंतर बोलावं,' असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil