मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'त्यांचा आदर केला पाहिजे', इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांना दिला सबुरीचा सल्ला

'त्यांचा आदर केला पाहिजे', इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांना दिला सबुरीचा सल्ला

चंद्रकांत खैरे हे माझे विरोधक जरी असले तरी मी त्यांचा नेहमीच आदर करतो. आम्ही त्या ठिकाणी  गणेशोत्सवाच्या समन्वयासाठी एकत्र आलो होतो.

चंद्रकांत खैरे हे माझे विरोधक जरी असले तरी मी त्यांचा नेहमीच आदर करतो. आम्ही त्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या समन्वयासाठी एकत्र आलो होतो.

चंद्रकांत खैरे हे माझे विरोधक जरी असले तरी मी त्यांचा नेहमीच आदर करतो. आम्ही त्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या समन्वयासाठी एकत्र आलो होतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 29 ऑगस्ट :  औरंगाबादमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (mla sanjay shirsat) यांच्यामध्ये मानपमानावरून नाराजी नाट्य रंगले होते. पण,  चंद्रकांत खैरे हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे, असा सल्लावजा चिमटा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (mla mim imtiaz jaleel) यांनी संजय शिरसाट यांना दिला.

पोलीस आयुक्तालय औरंगाबाद यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा सत्कार आधी केल्याने आमदार संजय शिरसाट कमालीचे नाराज होऊन निघून जात होते. परंतु, खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना हात पकडून बसवले. यामुळे आमदार संजय शिरसाठ यांच्यावर टीका होत आहे.  या संपूर्ण प्रकरणावर आता खासदार जलील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'चंद्रकांत खैरे हे जिल्ह्याचे खासदार राहिलेले आहेत. ते जिल्ह्यातील एक सीनियर लीडर आहेत, त्यांचा मान आदर करायलाच हवा असा सल्ला खासदार जलील यांनी आमदार संजय शिरसाट यांना दिला.

(उद्धव ठाकरेंनी टाकला डाव; संतोष बांगर यांच्यासमोर कडवं आव्हान; माजी काँग्रेस आमदार करणार शिवसेनेत प्रवेश)

तसंच, चंद्रकांत खैरे हे माझे विरोधक जरी असले तरी मी त्यांचा नेहमीच आदर करतो. आम्ही त्या ठिकाणी  गणेशोत्सवाच्या समन्वयासाठी एकत्र आलो होतो. एका चांगल्या कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे. मी त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर शिरसाट हे खाली बसले. पण त्या ठिकाणी हे सर्व घडणे हे दुर्दैवी असल्याचं देखील जलील म्हणाले.

तर, राज्यातील राजकीय परिस्थिती अशी आहे की सध्या कोण कोणासोबत आहे, हेच माहिती नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीन काही असे नवनवीन समीकरण बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको, असे म्हणत खासदार जलील यांनी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र आले तरी त्याचे काहीही आश्चर्य वाटले नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Lokmat news, Lokmat news 18, Maharashtra News, Marathi news