Home /News /maharashtra /

इंदिरा गांधींपेक्षाही भयानक आणीबाणी, मोदीजी हे खूप झालं.. खैरेंचा थेट PM ना इशारा, म्हणाले..

इंदिरा गांधींपेक्षाही भयानक आणीबाणी, मोदीजी हे खूप झालं.. खैरेंचा थेट PM ना इशारा, म्हणाले..

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक शहरात शिवसैनिक आक्रमक झाला आहे. यावर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 31 जुलै : शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते, अशी देखील माहिती समोर आली होती. ईडी अधिकाऱ्यांची तीन पथकं संजय राऊतांविरोधात तपास करत होते. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. जवळपास 1034 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राऊत यांच्यावर कारवाई सुरू झाल्यापासून शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. अनेक शहरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे? शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना ताब्यात घेणे ही आणीबाणी असून इंदिरा गांधी यांनी एकवेळ आणीबाणी लावली होती. त्याहीपेक्षा हे भयंकर आहे, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आता बस्स झालं, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली आहे. भाजपकडून शिवसेनेला संपवून टाकण्याचे प्रयत्न सुरु असून शिवसेना संपणार नाही. भाजपचे नेतेच या कारवाईच्या विरोधात असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे. हे सूडाचं राजकारण आहे. संजय राऊत हे कडवट शिवसैनिक आहे. ते घाबरणार नाही. राऊतांच्या मैत्री बंगल्यात सकाळपासून काय-काय घडलं? सुनील राऊतांनी सांगितला घटनाक्रम काय आहे प्रकरण? सुनील राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यांनी आज संजय राऊत यांच्या संपूर्ण घराची झडती घेतली. घरात असलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि काही कागदपत्रे सोबत नेले. विशेष म्हणजे ईडीचं एक पथक राऊतांच्या मुलीला घेवून त्यांच्या दादर येथील निवावस्थानी गेलं. तिथेदेखील अनेक तास अधिकाऱ्यांकडून झडती घेण्याचं काम सुरु होतं. पण ईडी अधिकाऱ्यांनी सोबत नेलेले कागदपत्रे हे काहीच कामाचे नाहीत. ईडी अधिकाऱ्यांना पत्राचाळ संबंधित कोणतेही कागदपत्रे आणि पुरावे मिळाले नाही, अशी माहिती सुनील राऊतांनी दिली. "ज्याप्रकारे संजय राऊतांना समन्स बजावण्यात आलं होतं त्याप्रकारे त्यांना पत्राचाळीबद्दल एकही डॉक्यूमेंट मिळालेलं नाही. त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली. पण त्यांना एकही डॉक्यूमेंट मिळाली नाहीत. जे बेकार डॉक्यमेंट्स आहेत ते घेवून निघाले आहेत. त्याबद्दलची माहिती आम्ही राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे. तेच डॉक्यूमेंट घेवून ते निघाले आहेत", अशी प्रतिक्रिया सुनील राऊतांनी दिली.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Pm modi, Sanjay raut

    पुढील बातम्या