मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

24 तासांमध्ये असं काय घडलं? सत्तारांना मिळालं मंत्रिपद अन् शिरसाट यांचा पत्ता झाला कट, पडद्यामागची INSIDE STORY

24 तासांमध्ये असं काय घडलं? सत्तारांना मिळालं मंत्रिपद अन् शिरसाट यांचा पत्ता झाला कट, पडद्यामागची INSIDE STORY

 अब्दुल सत्तार असे राजकारणी आहेत जे "होनी को अनहोनी करदे...अनहोनी को होनी" करू शकतात याचा प्रत्यय महाराष्ट्राला गेल्या 24 तासात आला

अब्दुल सत्तार असे राजकारणी आहेत जे "होनी को अनहोनी करदे...अनहोनी को होनी" करू शकतात याचा प्रत्यय महाराष्ट्राला गेल्या 24 तासात आला

अब्दुल सत्तार असे राजकारणी आहेत जे "होनी को अनहोनी कर दे...अनहोनी को होनी" करू शकतात याचा प्रत्यय महाराष्ट्राला गेल्या 24 तासात आला

औरंगाबाद, 09 ऑगस्ट : शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे कालपर्यंत टीईटी परीक्षा घोटाळ्यामुळे प्रकाशात आले होते. आजही ते प्रचंड चर्चेत आहेत ते मंत्रिमंडळ विस्तारात जागा मिळवल्याने...सत्तार हे बेधडक राजकारण करतात आणि त्यांना सतत यशही मिळत जातं. आता सत्तारांना मंत्रिपद मिळाले आहे. विशेष म्हणजे, सत्तारांची थेट कॅबिनेटमध्ये बढती मिळाली आहे. अब्दुल सत्तार असे राजकारणी आहेत जे "होनी को अनहोनी कर दे...अनहोनी को होनी" करू शकतात याचा प्रत्यय महाराष्ट्राला गेल्या 24 तासात आला. रात्री उशिरापर्यंत त्यांना मंत्रिपद मिळणार नाही असे चित्र होते. TET घोटाळ्यात त्यांचे नाव उचलले गेल्याने त्यांच्या मंत्रिपदाच्या अपेक्षा मावळल्या होत्या. शिक्षण उप संचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी अब्दुल सत्तार यांना क्लिन चिट दिली. त्यामुळे सत्तार रात्री 3 वाजता मुख्यमंत्री शिंदे यांना शिक्षण विभागाचे क्लीन चिट दिल्याचे पत्र घेऊन भेटले आणि त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलेच. TET परीक्षा घोटाळ्यामध्ये आपल्याला औरंगाबाद येथील नेत्यानेच गुंतवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय सत्तार यांना आहे. मंत्रिमंडळात स्थान असल्याची जोरदार चर्चा असतांना संजय शिरसाट यांना मात्र शपथ घेता आली नाही. मात्र ते नाराज नसल्याचे सांगत आहेत. (शिंंदे गटाचं 'मिशन सुरत-गुवाहाटी' फत्ते करणारे रवींद्र चव्हाणांना बक्षीस!) अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाल्याने औरंगाबादच्या राजकारणाचे बरेच चित्र बदलणार आहे. सर्वप्रथम सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि त्यांच्यात राजकीय संघर्ष अटळ आहे. सिल्लोड ला खेटून असलेले फुलंब्री गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदार संघावर सत्तरांचे चांगले वर्चस्व आहे. शिंदे गटात हे मतदार ओढण्याचा प्रयत्न सत्तार नक्की करतील. सत्तारांना रोखण्यासाठी सेना तयार आहेच. बंडखोर शिंदे गटातील काही नेते सुद्धा सत्तार यांची डोकेदुखी वाढवू शकतात. (Rakshabandhan : भावाला राशीनुसार अशा रंगाची बांधा राखी; त्याच्यावरची टळतील संकटे) अब्दुल सत्तार, अतुल सावे आणि संदीपान भुमरे हे तीन मंत्रिपद औरंगाबदाला आहेत. या तिघांपैकी अब्दुल सत्तार चतुर आणि लोकांमध्ये लोकप्रिय असल्याने जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण करतील. त्यांना आता सिल्लोड मतदासंघ हा मुलगा समीर सत्तार साठी सोडून औरंगाबद मध्य मध्ये विधानसभेत जम बसवायचा आहे. प्रशासकीय काम करून घेण्याचा हातखंडा अतुल सावे आणि भुमरे पेक्षा सत्तार यांच्याकडे जात असल्याने ते काम करतील.मात्र आपले औरंगाबदमध्ये बस्तान ही सुकर करतील.
First published:

पुढील बातम्या