Home /News /maharashtra /

BREAKING :औरंगाबादेत बस आणि बोलेरो गाडीचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू

BREAKING :औरंगाबादेत बस आणि बोलेरो गाडीचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू

औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव फाट्याजवळ हा अपघात घडला आहे.

औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव फाट्याजवळ हा अपघात घडला आहे.

औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव फाट्याजवळ हा अपघात घडला आहे.

औरंगाबाद, 25 मे : औरंगाबाद - जालना मार्गावर (Aurangabad Jalna Highway) भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बस आणि बोलेरो पिकअप गाडीची धडक (bus and bolero car accident) झाली आहे. या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव फाट्याजवळ हा अपघात घडला आहे.  बस आणि बोलेरो पिकअपची धडक झाली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला आहे. गाडीच्या समोरील भाग अक्षरश: चुराडा झाला आहे. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच  करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.  मदतकार्य चालू असून जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जळगावात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार दरम्यान,  जळगावमध्ये  शिरसोली ते वावडदा रस्त्यावर दुचाकीस्वाराला भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने 20 वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. रणजित संभाजी पानगडे हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आज दुपारीच्या सुमारास शिरसोली ते वावडदा रस्त्याने रणजित पानगडे हा दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पिकअप व्हॅन जोरदार धडक दिली. या धडकेत रणजीत पानगडे हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तातडीने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मदत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या