मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बिल्डर आग्रहारकर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण 30 कोटींचं कर्ज आणि...

बिल्डर आग्रहारकर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण 30 कोटींचं कर्ज आणि...

शहरातील प्रॉपर्टी डीलर भागवत चव्हाण यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल

शहरातील प्रॉपर्टी डीलर भागवत चव्हाण यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल

शहरातील प्रॉपर्टी डीलर भागवत चव्हाण यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad Cantonment, India
  • Published by:  sachin Salve

अविनाश कानडजे,प्रतिनिधी

औरंगाबाद, 24 सप्टेंबर : औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी धक्कादायक बाबसमोर आली आहे. आग्रहारकर यांनी एका डिलरकडून 30 कोटींचं कर्ज घेण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी 68 लाख रुपये दिले होते. पैसे बुडाल्यामुळे आग्रहारकर यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक तथा क्रेडाईचे कोषाध्यक्ष आणि आग्रहारकर यांनी बुधवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली होती. याप्रकरणी त्यांच्या भावाने जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शहरातील प्रॉपर्टी डीलर भागवत चव्हाण यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जवाहर नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

(पालकांनो सावधान! मुंबईत शालेय मुलांना अशाप्रकारे ड्रग्ज विक्री करायची महिला, वाचा संपूर्ण कहाणी)

आरोपी हा आग्रहाकर यांना 30 कोटी रुपयांचे कर्ज काढून देणार होता. त्यासाठी त्यांनी 68 लाख रुपये घेतले होते. पैसे घेऊनही कर्ज मिळवून दिले नाही त्यामुळे अडचणीत आलो आहे. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे, असे आग्रहाकर यांनी त्यांच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवल्याचे त्यांच्या भावाने सांगितले आहे.

(VIDEO:पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; काहींना अटक)

आग्रहारकर हे औरंगाबादमध्ये यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहे. शहरात त्यांचे अनेक ठिकाणी गृहप्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्प सुरू आहेत. धमकीच्या कॉलमुळे आत्महत्या केल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून आग्रहारकर यांना व्यावहारिक त्रास असल्याची परिवाराने माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

First published:

Tags: औरंगाबाद