मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रियकराने स्वत:ला पेटवून घेत प्रेयसीला मारली मिठी, औरंगाबाद हादरलं

प्रियकराने स्वत:ला पेटवून घेत प्रेयसीला मारली मिठी, औरंगाबाद हादरलं

आज दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात ही घटना घडली आहे.

आज दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात ही घटना घडली आहे.

आज दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात ही घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India
  • Published by:  sachin Salve

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 21 नोव्हेंबर : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात एका प्रियकराने स्वत:ला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात ही घटना घडली आहे. गजानन मुंडे आणि पूजा साळवे अशी प्रेमीयुगुलांची नाव आहे. हे दोघेही विद्यापीठात झुलॉजी विभागातील संशोधक विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

(श्रद्धा वालकर हत्याकांड : लहानपणापासूनच रागीट होता आफताब? बालपणीच्या मित्राने केले अनेक खुलासे)

आज दोघे हे शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था या कॉलेजमध्ये आले होते, त्यावेळी दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. त्यानंतर प्रियकर गजानन मुंडे याने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. त्यानंतर प्रेयसीला मिठी मारली. या घटनेमध्ये दोघे गंभीररित्या गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरू आहे. गजानन मुंडे याने हे पाऊल का उचलले, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

महिलेनं प्रियकराच्या पत्नीची गळा दाबून केला खून

दरम्यान, पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात एका महिलेनं प्रियकराच्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. हत्येची ही घटना राजगुरुनगरमधून समोर आली आहे. हत्येची ही घटना चार दिवसांपूर्वीची आहे. चार दिवसांपूर्वी राहत्या घरात कोमळ थिंगळे-केदारी या विवाहित महिलेचा खून झाला होता. हत्येनंतर ही आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रयत्नही केला गेला. मात्र, अखेर या घटनेचा पर्दाफाश झाला.

(उत्तर प्रदेशमध्ये सापडला आफताब सारखा प्रिन्स, प्रेयसीचा खून करून केले 6 तुकडे!)

विवाहित प्रियकरासोबतच्या नात्यात अडथळा ठरत असलेल्या प्रियकराच्या पत्नीचा महिलेनं गळा दाबून जीव घेतला असल्याचं समोर आलं आहे. राजगुरुनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येचा बनाव फसला. अखेर या प्रकरणी प्रियकराच्या पत्नीचा खून करणा-या प्रेयसीला राजगुरुनगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वाती रेंगडे असं आरोपी प्रेयसीचं नाव आहे.

First published: