मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सैन्यात भरती व्हायचं राहुन गेलं, 'everything will be ok' स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

सैन्यात भरती व्हायचं राहुन गेलं, 'everything will be ok' स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

 ओमकार डांगरे हा पोलीस व सैनिकी भरती तसंच शासकीय नोकरीची तयारी करत होता

ओमकार डांगरे हा पोलीस व सैनिकी भरती तसंच शासकीय नोकरीची तयारी करत होता

ओमकार डांगरे हा पोलीस व सैनिकी भरती तसंच शासकीय नोकरीची तयारी करत होता

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India
  • Published by:  sachin Salve

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 24 नोव्हेंबर : सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील बिडकीन एमआयडीसीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडकीन येथील ओमकार नारायण डांगरे (वय २१ वर्षे,रा.सोनार गल्ली) हा तरुण घरी न सांगता सकाळपासून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे आई वडिल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी तांत्रिक विश्लेषण करत मोबाईल नंबर वरुन ट्रॅक केले असता मोबाईल नंबरचे लोकेशन डीएम आयसी औद्योगिक वसाहतीत मिळून येत असल्याचे दिसून आले.

(विवाहित प्रेयसी दुर्लक्ष करत असल्याने चढला पारा; पुण्यातील प्रियकराने गाठला क्रूरतेचा कळस)

पोलिसांनी औद्योगिक वसाहतीमधील सेक्टर क्रमांक १८ मध्ये धाव घेत विहिरीजवळ ओमकार याची गाडी आणि चप्पल दिसून आली असता सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी १ तासाचे अथक परिश्रम घेत मृतदेह विहिरीच्या बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी ओमकार डांगरे याने त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटस वर "I just feel like if I died everything will be ok:) " अशा प्रकारे स्टेटस ठेवत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

(धक्कादायक! मनमाडमध्ये रेल्वेत प्रवाशांवर माथेफीरूचा अ‍ॅसिड हल्ला; चार जण जखमी)

ओमकार डांगरे हा पोलीस व सैनिकी भरती तसंच शासकीय नोकरीची तयारी करत होता अशी माहिती मित्रांच्या वतीने देण्यात आली. सदरील घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस नाईक शिवानंद बनगे, पोलीस कॉन्स्टेबल मगर,धनेधर आदींच्या पथकाच्या वतीने परिश्रम घेतले. अग्निशमन नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पदमपूरा पथक यांच्या वतीने मुख्य अग्निशमन अधिकारी आर के सुरे यांच्या आदेशानुसार, उप अग्निशमन केंद्र अधिकारी मोहन मुंगसे, अग्निशमन दलाचे पथक ड्युटी ऑफिसर विनायक लिमकर,अग्निशामक जवान परेश दुधे,दिनेश मुंगसे,अशोक पोटे,तुषार तौर,प्रसाद शिंदे ,वाहन चालक अजय कोल्हे यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. यावेळी बिडकिन व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published: