Home /News /maharashtra /

Aurangabad : शहरात रक्ताचा तुटवडा; रक्तासाठी वणवण फिरताहेत नातेवाईक

Aurangabad : शहरात रक्ताचा तुटवडा; रक्तासाठी वणवण फिरताहेत नातेवाईक

औरंगाबाद शहरात (Aurangabad city) रक्ताची टंचाई (Blood shortage) निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे.

  औरंगाबाद, 1 जून : वीजेची टंचाई, पाण्याची टंचाई आणि इतर सोयी-सुविधांची टंचाई तुम्हाला माहिती असतील, पण औरंगाबाद (Aurangabad city) शहरात रक्ताची टंचाई (Blood shortage) निर्माण झाली आहे. शहरातील घाटे रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. वेळवर रक्ताचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.

  औरंगाबाद शहरात घाटी रुग्णालय हे गोरगरिबांचं रुग्णालय म्हणून ओळखलं जातं. जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये रुग्ण तेथे उपचारासाठी येतात. रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. अत्यावश्यक उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांना रक्ताची गरज भासते तेव्हा घाटी रुग्णालयातील रक्तपेढीतून रक्त पुरविण्यात येते. मात्र, या रक्तपेढीमध्ये आता रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. त्यातून रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होताना दिसत आहे.

  वाचा : Heat wave Maharashtra : राज्यात उष्णतेचा कहर काही थांबेना, मागच्या 24 तासात दोघांचा उष्माघाताने मृत्यू

  या संदर्भात घाटी रुग्णालयातील रक्तपेढीचे प्रमुख डाॅ. प्रगती फुलगीरकर म्हणाल्या की, "उन्हाळा असल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयं बंद आहेत त्यामुळे रक्ताची टंचाई जाणवू लागली आहे. कारण, शाळा आणि महाविद्यालयं बंद असल्यामुळे रक्तपेढी चालकांना रक्तदान शिबिरं घेता येत नाहीत. तसेच रक्तदातेही उपलब्ध नसतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये अनेकांची रक्तदान करण्याची इच्छा नसते. या कारणांमुळे घाटी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा होत आहे", असं स्पष्टीकरण डॉ. प्रगती फुलगीरकर यांनी दिले.

  वाचा : Jalna Accident : दुचाकीवरील नियंत्रण सुटले; चुलत बहिणीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच तरुणाचा अपघातात मृत्यू

  घाटी रुग्णालयात आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणारे रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज निर्माण झालेली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी वणवण फिरावे लागत आहे. यामुळे शहरातील नागरिकांनी घाटी रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्तदान करून गरजू रुग्णांना सहकार्य करावे असे आवाहन घाटी रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

  First published:

  पुढील बातम्या