मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात भाजपचे राज्यातील पहिलेच आंदोलन, नेमकं काय आहे प्रकरण?

शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात भाजपचे राज्यातील पहिलेच आंदोलन, नेमकं काय आहे प्रकरण?

सिल्लोड नगरपरिषदेसमोर भाजपने डफली बजाओ आंदोलन केले.

सिल्लोड नगरपरिषदेसमोर भाजपने डफली बजाओ आंदोलन केले.

सिल्लोड नगरपरिषदेसमोर भाजपने डफली बजाओ आंदोलन केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sillod, India

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 6 फेब्रुवारी : राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार आहे. मात्र, राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार असताना औरंगाबादच्या सिल्लोडमधून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगरपरिषदेसमोर भाजपने डफली बजाओ आंदोलन केले. शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात भाजपचे राज्यातील पहिलेच आंदोलन आंदोलन आहे. या आंदोलनाची राज्यात एक चर्चा होत आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगर परिषदेच्या करवाढ विरोधात आज सिल्लोडमध्ये भाजपच्या वतीने डफडे वाजवा आंदोलन करण्यात आले. शिंदे गटाच्या आणि त्यांच्या मंत्र्याविरोधात विरोधात भाजपचे हे राज्यातील पहिलेच आंदोलन आहे.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची 30 वर्षांपासून एक हाती सत्ता असणाऱ्या सिल्लोड नगर परिषदेच्या विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करवाढीचा मुद्दा घेऊन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने मागील काही दिवसांपूर्वी शहरातील मालमत्ता करवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. ही करवाढ नियमबाह्य पद्धतीने आकारल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

यामुळे भाजपच्या वतीने यापूर्वी उपोषणही केले होते. या करवाढीला तीव्र विरोध करण्यासाठी सिल्लोड शहरातील भाजपच्या कार्यालयापासून ते नगरपरिषदेच्या कार्यालयापर्यंत डफली वाजवा आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - थोरात, पटोलेंमध्ये खरच वाद आहे? अशोक चव्हाणांनी सांगितली 'अंदर की बात'

राज्यात मागच्या वर्षी सत्तांतर झाले. एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे फडणवीस सरकारमध्ये यानंतर मग कृषीमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी शपथ घेतली. सध्या अब्दुल सत्तार हे महाराष्ट्राचे कृषीमंत्री आहेत.

First published:

Tags: Aurangabad News, BJP, Eknath khadse, Maharashtra politics