मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शाळेत झाली भाकरी बनवण्याची स्पर्धा, मुलांना समजले आईचे कष्ट Video

शाळेत झाली भाकरी बनवण्याची स्पर्धा, मुलांना समजले आईचे कष्ट Video

 ज्ञानेश विद्यामंदिर शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाकरी थापण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

ज्ञानेश विद्यामंदिर शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाकरी थापण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

ज्ञानेश विद्यामंदिर शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाकरी थापण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 24 सप्टेंबर : शाळकरी मुलांमध्ये समानतेची जाणीव व्हावी घरातलं प्रत्येक काम करता यावं या उद्देशाने औरंगाबाद शहरामधील ज्ञानेश विद्यामंदिर शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाकरी थापण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यासाठी लागणारे साहित्य पीठ, चूल, तवा सर्व मुलांना घरून आणण्यास सांगितले होते. स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे आईच्या गोल भाकरीची जाणीव झाल्याची भावना या वेळी आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.

या अनोख्या स्पर्धेत 45 विद्यार्थी सहभागी झाले होते. या 45 विद्यार्थ्यांमध्ये पाच जणांचा एक ग्रुप तयार करून त्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी सर्वात चांगली भाकर बनवण्याची ही स्पर्धा रंगली होती. भाकरी थापत असताना विद्यार्थ्यांना चूल पेटवताना मोठी कसरत यावेळी करावी लागली. नुकताच पाऊस पडल्यामुळे ओल्या काड्या पेटवताना मुलांना मोठी दमछाक करावी लागली. धूर डोळ्यात गेल्याने अनेकांनी आजी आणि आईच्या आठवणी सांगत एक दुसऱ्यांना धीर देत भाकरी यावेळी थापल्या.

हेही वाचा : Aurangabad : लहान मुलांमध्ये भाजण्याचे प्रमाण जास्त! अशी घ्या काळजी

मुलांमध्ये समानतेची जाणीव व्हावी या साठी स्पर्धा

कोरोना पासून मोबाईलच्या आहारी गेल्याच्या तक्रारी वाढत होत्या. मात्र, लहान मुलांमध्ये समानतेची जाणीव व्हावी हा देखील मोठा प्रश्न होता. यामुळे शाळेतर्फे मुलांसाठी भाकरी थापण्याची स्पर्धा आयोजित करून मुलांमध्ये समानतेची जाणीव निर्माण होण्यासाठीचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे,अशी प्रतिकिया यावेळी संस्थेच्या सचिव पूजा विटोरे यांनी दिली. 

विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवत या स्पर्धेचा आनंद घेतला

विद्यार्थ्यांमध्ये शाळेपासून समानतेची भावना निर्माण व्हावी. यासाठी ज्ञानेश विद्यामंदिर शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी भाकरी थापण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवत या स्पर्धेत आनंद घेतला अशी प्रतिक्रिया यावेळी शिक्षक रामनाथ पंडुरे यांनी दिली. 

हेही वाचा : Mumbai : कोरोनात गेली इंजिनिअरची नोकरी, आता फुड स्टॉलमधून करतोय लाखोंची कमाई! Video

भाकरी बनवताना वाटलं नव्हतं भाकरी थापता येतील. पण प्रयत्न करून बघितला असता भाकरी बनवता आली. भाकरी बनवताना चुलीचा धूर डोळ्यात गेला आणि गोलाकार बनवताना थोडी कसरत करावी लागली. यामुळे आईच्या भाकरीची चव आणि मेहनतीची जाणीव झाली, असं दीपक आडे या विद्यार्थ्याने सांगितले.

यांनी पटकावला नंबर

या स्पर्धेत चांगली भाकरी केलेल्या तीन जणांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रथम ग्रुप कृष्णा गोजरे, साहिल सावळे, आर्यन लहाने, रितेश उंदरे, हरिओम गोजरे, सुजल खिल्लारे यांनी क्रमांक पटकावला.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News