मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेआधी वातावरण तापले, पोलिसांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात

औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेआधी वातावरण तापले, पोलिसांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात


राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या वतीने शांती मार्चचे आयोजन केले होते.

राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या वतीने शांती मार्चचे आयोजन केले होते.

राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या वतीने शांती मार्चचे आयोजन केले होते.

औरंगाबाद, 01 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery aurangabad sabha) यांनी भोंग्याचा मुद्या उपस्थितीत करत सभांचा धडाका लावला आहे. औरंगाबादमध्ये थोड्याच वेळात राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. पण त्यांच्या सभेच्या आधी वंचितच्या (vanchit bahujan aghadi) कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  आज सायंकाळी शांती मोर्चा काढणाऱ्या वंचित च्या पदाधिकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या वतीने शांती मार्चचे आयोजन केले होते. हा शांती मार्च राज ठाकरे यांच्या सभास्थळावरून आणि सभेच्या वेळीच जाणार होता. पोलिसांनी आधीच या शांती मार्चला परवानगी नाकारली होती. पण तरीही शांती मोर्च काढणार अशी भूमिका घेतल्याने शेवटी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.  १ मे च्या राज ठाकरेच्या सभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित  शांती मार्च या रॅलीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम शहर अध्यक्ष संदीपभाऊ शिरसाठ,देवा त्रिभुवन यांना अटक केली आहे.

(ड्यूटीच्या पहिल्याच दिवशी नर्सवर गँगरेप अन् हत्या; मृतदेह पाहून थरकाप उडाला)

तर दुसरीकडे, मुंबईतही काही संघटना आक्रमक झाल्या आहेत. भीम आर्मी संघटनेचे अशोक कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घाटकोपरमधून पोलिसांनी कांबळे यांना ताब्यात घेतले आहे. राज ठाकरे यांच्या सभेला भीम आर्मीने विरोध केल होता. ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होत. पण, त्याआधीच पोलिसांनी अशोक कांबळे यांना ताब्यात घेतले.

बुलडाण्यात निघाला वंचितच शांती मार्च

दरम्यान, बुलडाण्यात वंचित आघाडीची मार्च निघाला आहे.  1 मे हा महाराष्ट्र दिन चांगल्या पद्धतीने साजरा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून देशात महागाई आणि कोरोनासारखे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यावरून दंगली घडवण्याचं आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम जर कुणी करत असेल तर त्याला आमचा विरोध असेल असं वंचित बहुजन आघाडीच्या स्पष्ट करीत आज राज्यभर शांती मार्च काढण्यात आले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातही हा मार्च काढण्यात आला असून या रॅलीचा समारोप शहरातील जमा मस्जिदमध्ये करण्यात आला आहे.

First published: