मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये रंगलं पोस्टर War,शिवसेनेची चौकाचौकात बॅनरबाजी

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये रंगलं पोस्टर War,शिवसेनेची चौकाचौकात बॅनरबाजी

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये पोस्टर (poster) वॉर बघायला मिळालं.

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये पोस्टर (poster) वॉर बघायला मिळालं.

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये पोस्टर (poster) वॉर बघायला मिळालं.

  • Published by:  Pooja Vichare

औरंगाबाद, 30 एप्रिल: उद्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. काही तासातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादेमध्ये पोहोचणार आहे. मात्र राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये पोस्टर (poster) वॉर बघायला मिळालं.

जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं पोस्टर वॉर सुरू झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शिवसेना आमदार आणि प्रवक्ते अंबादास दानवे यांनी फेसबुकवर 'हे बाळासाहेबांचं संभाजीनगर' अशी पोस्ट केली आहे.

तर ज्या राज ठाकरेंच्या हॉटेल च्या काही अंतर परिसरात शिवसेनाच्या वतीने होर्डिंग लावण्यात आल्या आहेत. या होर्डिंगवर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सम दुसरे होणे नाही, असे बॅनर लावण्यात आले आहे.

यामुळे शहरात एकंदरीत शिवसेनेच्या वतीने पोस्टर आणि सोशल वॉर पाहायला मिळत आहे.

राज ठाकरेंची उद्या सभा

औरंगाबाद (Aurangabad)मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर 1 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा (MNS Chief Raj Thackeray Rally) आयोजित करण्यात आली आहे. पोलिसांनी काही अटी-शर्तींच्या आधारावर सभेला परवानगी दिली आहे.

पोलिसांच्या सभेसाठी महत्त्वाच्या दहा अटी :

1) सभास्थळी आसनमर्यादा ही 15 हजार इतकी आहे. त्यामुळे 15 हजार पेक्षा जास्त जणांना आमंत्रित करु नये. जास्त नागरिकांना आमंत्रित करुन चेंगराचेंगरी किंवा इतर दुर्घटना घडल्यास आयोजकांना दोषी धरलं जाईल.

2) सभेदरम्यान कोणत्याही वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळथ असणाऱ्या प्रथा/परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होणार नाही, त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही, अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कुणीही करणार नाही. याबाबत आयोजक आणि वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.

3) सभा ही 1 मे रोजी संध्याकाळी साडेचार ते रात्री पावणे दहा वाजेच्या वेळेत आयोजित करण्यात यावी. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळत कोणताही बदल करण्यात येऊ नये.

4) सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेत येताना किंवा जाताना कुणीही आक्षेपार्ह विधान, वर्तवणूक, घोषणाबाजी, हुल्लडबाजी आणि असभ्य वर्तन करनार नाही, याची दक्षता घ्यावी.

5) सभेला येणाऱ्या वाहनांनी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, मार्ग न बदलण्याच्या सूचना द्याव्या. वाहनांनी शहरात आणि इतर ठिकाणी वेगमर्यादाचे पालन करावे. सभेसाठी येताना-जाताना कार किंवा बाईक रॅली काढू नये.

6) कार्यक्रमवेळी कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये आणि त्यांचं प्रदर्शन करु नये.

7) स्वयंसेवक नेमण्यात यावे. त्यांची नावे, मोबाईल नंबर पोलिसांना द्यावे. तसेच कोणत्या गावातून किती नागरीक येणार, त्यांची संख्या आणि त्यांच्या वाहनांचा प्रवासाचा मार्ग विषयी माहिती पोलिसांना द्यावी.

8) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आवाजाची मर्यादा असावी. त्या नियमांचा भंग केल्यास 5 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंडांची शिक्षा होऊ शकते.

9) सभेदरम्यान बस, मेडिकल, वीज, रुग्णवाहिका अशा इत्यादी अत्यावश्यक सेवांना बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.

10) सभेसाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी.

First published:

Tags: Raj Thackeray (Politician), Shivsena