बीड, 20 डिसेंबर : बीडमध्ये (Beed News) 3 महिन्यांपासून कुत्रा आणि माकडांमध्ये (Monkey Vs Dog) भांडण सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. 250 हून अधिक पिल्लांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना वन विभागाच्या टीमने पकडलं आहे. त्या गावातील काही कुत्र्यांनी एका माकड्याच्या पिल्लाला जीवे मारल्यानंतर हे गँगवॉर सुरू झालं होतं.
न्यूज एजन्सी एएनआयमधील वृत्तानुसार, तब्बल 250 कुत्र्याच्या पिल्लांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना वन विभागाने पकडलं आहे. बीडमधील वन अधिकारी सचिन कांड यांनी सांगितलं की, बीडमधील कुत्र्यांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना नागपूरच्या वन विभागाच्या टीमने पकडलं आहे.
Doge unions assembling from different corners of the country in maharashtra to take revenge #MonkeyVsDoge pic.twitter.com/rOhy2whqkK
— slayer (@unspoken_wordin) December 19, 2021
दोन्ही माकडांना नागपूर पाठवण्यात आलं आहे आणि जवळच्या जंगलात यांना सोडण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
#MonkeyVsDoge trending Meanwhile monkey to dog..😔 pic.twitter.com/uMzSyJ4BST
— Ashutosh Srivastava (@ashutosh_sri8) December 18, 2021
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीडमधील लावून गावात माकडांनी कुत्र्यांवर हल्ला करीत त्याच्या पिल्लांची हत्या करीत होते. हे माकडं पिल्लांना उंच झाडांवर किंवा घरांवर नेत जमिनीवर फेकून देत होते. एका स्थानिकाने एएनआयला सांगितलं की, गेल्या 2 ते 3 महिन्यात अशा घटना वारंवार समोर आल्या आहेत.
Is this happening presently in India🙄?#MonkeyvsDog #MonkeyVsDoge pic.twitter.com/91cmRu5c1t
— Jaya Singh (@jayasingh_14) December 19, 2021
माकडं कुत्र्याच्या पिल्लांना उंचावर नेत त्यांना खाली फेकून देत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. आतापर्यंत कमीत कमी 250 कुत्र्यांची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा-औरंगाबाद हादरलं! 10 रुपयांसाठी तरुणाचं राक्षसी कृत्य; रक्तबंबाळ करत घेतला जीव
Monkey 🐒 & Dog 🐕#MonkeyVsDoge pic.twitter.com/jOIcFd0siO
— Pranay Sharma (@pranaysharma02) December 18, 2021
यानंतर माकडं शाळेत जाणाऱ्या मुलांवरही हल्ला करू लागल्याचं दिसून आलं. यानंतर स्थानिकांनी वन विभागाकडे तक्रार केली. या घटनेवरुन सोशल मीडियावर अनेक मीम्सही शेअर केले जात आहे. शिवाय ट्विटरवर #MonkeyvsDog देखील ट्रेंड होत होता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.