मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

झटपट श्रीमंत होण्यासाठी इंजिनिअरने छापल्या बनावट नोटा, 5 जणांच्या टोळक्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

झटपट श्रीमंत होण्यासाठी इंजिनिअरने छापल्या बनावट नोटा, 5 जणांच्या टोळक्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Aurangabad police arrest engineer for printing fake currency: औरंगाबादमध्ये इंजिनिअरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Aurangabad police arrest engineer for printing fake currency: औरंगाबादमध्ये इंजिनिअरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Aurangabad police arrest engineer for printing fake currency: औरंगाबादमध्ये इंजिनिअरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

औरंगाबाद, 30 डिसेंबर : पैसा कमावून सर्व सुख सोयी, घर, आलिशान गाडी आपल्याकडे असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी प्रत्येकजण मेहनत देखील करत असतो. मात्र, औरंगाबाद (Aurangabad)मधील इंजिनिअरने झटपट श्रीमंत होण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबला आणि आता त्याचा परिणाम म्हणजे त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इंजिनिअरसोबतच त्याच्या इतर साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. (Aurangabad engineer arrested for printing fake currency)

बनावट नोटांचा सुरू केला कारखाना

संगणक इंजिनिअर असलेल्या औरंगाबादच्या इंजिनिअरने झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला. धक्कादायक म्हणजे यापूर्वीदेखील बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर देखील झटपट श्रीमंत होण्यासाठी समरान ऊर्फ लक्की याने बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली.

भाड्याच्या घरात सुरू होता कारखाना

कारागृहातून सुटल्यावर समरान याने आपल्या मित्रांसोबत बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला. मुकुंदवाडी येथे भाड्याच्या खोलीत समरान आपल्या मित्रांसोबत बनावट नोटा छापत होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकून सर्व आरोपींना अटक केली आहे.

वाचा : प्रेमाच्या मॅटरमध्ये गजाआड गेला, बाहेर आल्यावर 'ती'च्या विरहात घेतला गळफास

बनवाट नोटांचा मोठा साठा जप्त

पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरुन बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये 500 रुपये, 100 रुपये आणि 50 रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश आहे. यासोबतच पोलिसांनी घटनास्थळावरुन कम्प्युटर, प्रिंटर, कागद असा ऐवजही ताब्यात घेतला आहे.

लासलगावमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

ऑक्टोबर महिन्यात नाशिक जिल्ह्यात पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. पाचशे रुपयांच्या बनावट नोटा (Fake currency) चलनात आणणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसांनी (Lasalgaon Police) पर्दाफाश केला होता. एका महिलेसह पाच जणांना सापळा रचून पोलिसांनी अटक (police busted fake currency racket) केली. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून 500 रुपयांच्या 291 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. आरोपींनी नकली नोटा कुठून आणल्या आणि त्या किती चलनात आणल्या याचा कसून तपास केला जात आहे.

लासलगाव परिसरात नकली नोटा चलनात आणल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मोहन बाबुराव पाटील, प्रतिभा बाबुराव घायाळ, विठ्ठल चपांलाल नाबरीया, रविंद्र राऊत, विनोद पटेल यांना अटक करण्यात आली.

First published:

Tags: Aurangabad, Crime