अविनाश कानडजे (औरंगाबाद), 06 डिसेंबर : औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हेगारी प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून खून, गुंडगिरी आणि चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने औरंगाबादकरांना चांगलाच धसका बसला आहे. दरम्यान यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पैठणमधील नेहरू चौकात भर रस्त्यात महिलेच्या डोक्यात फावडे मारून खून करण्यात आला आहे. ही घटना सकाळी 7 च्या दरम्यान घडली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हे ही वाचा - भयानक! दारूच्या नशेत आईची हत्या, भाऊ आणि वडिलांवरही हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पैठणमधील नेहरू चौकात भर रस्त्यात महिलेच्या डोक्यात फावडे मारून खून करण्यात आला आहे. ही घटना सकाळच्या दरम्यान घडली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बायकोवरील संशयाच्या कारणावरून भर चौकात डोक्यात फावडे मारून हत्या केली आहे. आरोपी पती ज्ञानेश्वर पुंडलिक पोळ असे नाव आहे.
हे ही वाचा : महिलेने केली पोटच्या मुलाची हत्या, तुरुंगात गेल्यावर उचललं आणखी भयानक पाऊल
दरम्यान या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सकाळच्या दरम्यान ही घटना घडल्याने गजबजलेल्या चौकात अचानक गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होत घटनेचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, Murder, Murder news