मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad Accident: औरंगाबादमध्ये भीषण अपघात; गाड्यांचे झाले दोन तुकडे, 6 जणांचा मृत्यू तर 12 जखमी

Aurangabad Accident: औरंगाबादमध्ये भीषण अपघात; गाड्यांचे झाले दोन तुकडे, 6 जणांचा मृत्यू तर 12 जखमी

Aurangabad major accident between truck and tractor: औरंगाबादमधील सिल्लोड येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणाचा मृत्यू झाला आहे.

Aurangabad major accident between truck and tractor: औरंगाबादमधील सिल्लोड येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणाचा मृत्यू झाला आहे.

Aurangabad major accident between truck and tractor: औरंगाबादमधील सिल्लोड येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणाचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद, 30 डिसेंबर : औरंगाबादमध्ये भीषण अपघात (major accident in Aurangabad) झाला आहे. मिनी ट्रक आणि ऊसाच्या ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक झाली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 12 जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड जवळ हा अपघात झाला आहे. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे. (Major accident in Auragabad, Truck and Tractor collied each other in sillod)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लग्नावरून परतणार्‍या छोट्या ट्रकने ऊसाचा ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळातच घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू कऱण्यात आले. या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचे अक्षरश: दोन तुकड्यांत विभाजन झाल्याचं पहायला मिळत आहे. ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले की, ट्रक चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाहीये.

दोन दिवसांपूर्वी पुण्यात भीषण अपघात

28 डिसेंबर रोजी पुण्यात भीषण अपघात झाला होता. पुण्यातील (Pune) नवले पुलाजवळ सातत्याने होणाऱ्या अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाही. याठिकाणी 28 डिसेंबरला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात तीन जणांचा मृत्यू (3 died in accident) झालाय. उतारावर कंटेनर मागे सरकल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

वाचा : धोक्याची घंटा; भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत 43 टक्क्यांनी वाढ

मुंबईहून सातार्‍याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा कंटेनर उताराच्या दिशेने पाठीमागे सरकत गेला. यामध्ये पाठीमागे असणाऱ्या काही वाहनांना त्याची धडक बसली. यामध्ये काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

जीपचा टायर फुटून भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला होता. अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात झाला होता. जीपचा टायर फुटल्याने हा अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक प्रवाशी जखमी झाले होते.

First published:

Tags: Accident, Aurangabad