मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Auranhabad Midc Crime News : भर चौकात एकावर 5 जणांनी तलवारीने केले सपासप वार, औरंगाबादमधील घटनेने खळबळ

Auranhabad Midc Crime News : भर चौकात एकावर 5 जणांनी तलवारीने केले सपासप वार, औरंगाबादमधील घटनेने खळबळ

औरंगाबादमधील रांजणगाव शेणपुंजी येथे योगेश मस्के या तरुणावर रांजणगाव शेंनपूजी येथील मुख्य वर्दळीच्या चौकात चार ते पाच व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला आहे.

औरंगाबादमधील रांजणगाव शेणपुंजी येथे योगेश मस्के या तरुणावर रांजणगाव शेंनपूजी येथील मुख्य वर्दळीच्या चौकात चार ते पाच व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला आहे.

औरंगाबादमधील रांजणगाव शेणपुंजी येथे योगेश मस्के या तरुणावर रांजणगाव शेंनपूजी येथील मुख्य वर्दळीच्या चौकात चार ते पाच व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

अविनाश कानडजे (औरंगाबाद), 13 जानेवारी : औरंगाबाद जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये भर चौकात सकाळच्या दरम्यान खून केल्याची घटना ताजी असताना अशीच एक घटना समोर आली आहे. वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे योगेश मस्के या तरुणावर रांजणगाव शेंनपूजी येथील मुख्य वर्दळीच्या चौकात चार ते पाच व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. याबाबत औरंगाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे योगेश मस्के या तरुणावर रांजणगाव शेंनपूजी येथील मुख्य वर्दळीच्या चौकात चार ते पाच व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. याबाबत औरंगाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान त्या व्यक्तीस गंभीर जखमी केले आहे. जखमी तरुणाला शासकीय घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

दरम्यन या प्रकरणी घटनास्थळी एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी भेट देऊन पाहणी केली. एमआयडीसीमध्ये झालेल्या घटनेचा वाळूज पोलीस हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा : दिरासोबत संबंध ठेवावे लागले; हलालास नकार देताच पतीने दिला तिहेरी तलाक, पीडितेची धक्कादायक कहाणी

औरंगाबादमध्ये भीषण अपघात

श्रीक्षेत्र राजुर गणपती येथून श्री गणेशाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भोकरदन शहरातील तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातील हे चौघेही तरुण गणपतीच्या दर्शनासाठी एकाच मोटर सायकलवर गेले होते.

आज मंगळवारी अंगारिका चतुर्थी असल्याने भोकरदन शहरातील चौघे तरुण एकाच दुचाकीवर गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. मध्यरात्री दर्शन झाल्यानंतर भोकरदनकडे येत असताना पहाटे 4 वाजेच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. 

हे ही वाचा : जावयाने सासूला पळवल्याच्या केसमध्ये नवा ट्विस्ट; आधीपासूनच सुरू होतं प्रकरण, म्हणून लेकीसोबत...

या अपघातात भोकरदन येथील फत्तेपूर रस्त्यावरील निलेश हिरालाल चव्हाण (वय २०) आणि प्रशांत आरके (वय २१) हे दोन तरुण जागीच ठार झाले. तर अनिकेत बाळू वाहुळे (वय 19) आणि आरेफ सलीम कुरेशी (वय 22, रा. नवे भोकरदन) हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime, Crime news