Home /News /maharashtra /

ना शिंदे गट, ना भाजप, औरंगाबादच्या पठ्ठ्याने स्वतः ला घोषित केले सामाजिक न्यायमंत्री!

ना शिंदे गट, ना भाजप, औरंगाबादच्या पठ्ठ्याने स्वतः ला घोषित केले सामाजिक न्यायमंत्री!

या अगोदर देखील भारत फुलारे यांनी मुख्यमंत्री करा असे पत्र राष्ट्रपतींना लिहिले होते

    औरंगाबाद, 02 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाले नाही त्यामुळे कुणाचीही मंत्रिपदी निवड झालेली नाही. मात्र, औरंगाबादमध्ये एका पठ्ठ्याने स्वत: सामाजिक न्यायमंत्री घोषित केलं आहे. त्याच्या या प्रतापमुळे शहरात एकच चर्चा रंगली आहे. औरंगाबाद शहरातील एका पठ्याने स्वतःला राज्याचा सामाजिक न्यायमंत्री म्हणून घोषित केले आहे. यासंबंधीचे बॅनर तयार करून हा पठ्ठ्या स्वतःच्या गाडीवर लावून फिरत आहे. भारत आसाराम फुलारे असे या पठ्ठ्याचे नाव आहे. त्याने लावलेले गाडीवरील बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या अगोदर देखील भारत फुलारे यांनी मुख्यमंत्री करा असे पत्र राष्ट्रपतींना लिहिले होते. नुकताच मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसीय औरंगाबाद दौरा केला. या दौऱ्यातच त्याने 'मी स्वतःला सामाजिक न्याय मंत्री म्हणून घोषित करतो' अशी घोषणा केली.  विशेष म्हणजे, काही नागरिक या पठ्याकडे आपल्या समस्या घेऊन देखील आल्याचे त्याने सांगितले. (VIDEO:हडपसरमध्ये 'एकनाथ शिंदे' उद्यान वादात,वैयक्तिक नामकरणास संस्थांचा विरोध) 'संविधानानुसार राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणे न्यायिक होते परंतु काही अपरिहार्य कारणामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. परिणामी महाराष्ट्राच्या विविध समस्या वाढत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेवर पोरकेपणाची वेळ आली आणि यामुळे आता जनतेने स्वयंघोषित मंत्रीपदे घेण्याची गरज आहे. यामुळे मी जनतेच्या हितासाठी स्वतः सामाजिक न्याय मंत्री म्हणून घोषित करून जनतेच्या न्याय व हक्कासाठी लढण्याची शपथ घेतल्याचे फुलारे यांनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या