मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad: 'किती दिवस कारणं ऐकायची...' पाणी योजनांच्या कामावर आयुक्तांचा पारा चढला!

Aurangabad: 'किती दिवस कारणं ऐकायची...' पाणी योजनांच्या कामावर आयुक्तांचा पारा चढला!

औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर गाजत आहे. या प्रश्नावर वारंवार सूचना करूनही प्रगती होत नसल्यानं आयुक्त चांगलेच संतापले होते.

औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर गाजत आहे. या प्रश्नावर वारंवार सूचना करूनही प्रगती होत नसल्यानं आयुक्त चांगलेच संतापले होते.

औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर गाजत आहे. या प्रश्नावर वारंवार सूचना करूनही प्रगती होत नसल्यानं आयुक्त चांगलेच संतापले होते.

औरंगाबाद, 14 सप्टेंबर :  औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर गाजत आहे. या प्रकरणात वारंवार सूचना देऊनही शहराच्या पाणी योजनेची गती वाढत नाहीय. या प्रकरणात वारंवार सूचना देऊनही शहराच्या पाणी योजनेच्या कामाची गती वाढलेली नाही. त्यामुळे  विभागीय आयुक्त चांगले संतापले असून त्यांनी ठेकेदार आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चांगलीच खरडपट्टी केली.कामाला गती द्या अन्यथा वेगळा विचार केला जाईल अशी तंबी देखील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली. काय आहे प्रकरण? औरंगाबादमध्ये उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे अक्षरश: वण-वण म्हणून फिरावे लागले. घरात सहा ते आठ दिवस अड पाणी येत असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. यासाठी न्यायालयाने देखील सूचना केल्या होत्या. औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी 1680 कोटींची नवीन पाणी योजना जाहीर करण्यात आली.  पाणी प्रश्न सुटण्यासाठी पैसे देखील मिळाले. योजनेचे काम सुरू होऊन दोन वर्ष होऊन उलटली मात्र अद्यापही काम सुरूच आहे. या पाणी योजनेसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर स्वतः लक्ष घालून आहेत वेळोवेळी सूचना देखील ते या पाणी योजनेच्या संदर्भात संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना करत आहेत.  मात्र, त्यानंतरही पाणी योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंगळवारी योजनेच्या कामांचा आढावा घेतला. बैठकीस मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता आर. व्ही. लोलापोड, कार्यकारी अभियंता अजयसिंग, उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे, कार्यकारी अभियंता एम. बी. काझी आदींची प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत केंद्रेकरांचा पारा चांगलाच चढला होता. अखेरचा प्रवासही झाला वाईट! औरंगाबादमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पार्थिवाची अवहेलना 'किती दिवस तुमची कारणे ऐकायची, आत कामाला गती का दिली जात नाही, मुख्य जलवाहिनीचे काम थांबले, अंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे कामही सुरू नाही. जलकुंभाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. नाटके बंद करून कामाला गती द्या, नसता तुमच्याबद्दल वेगळा विचार करावा लागेल, मी इथं तुमच्या अडचणी ऐकायला बसलेलो नाही,' या कठोर शब्दात केंद्रेकर यांनी सर्वांची खरडपड्डी काढली.
First published:

Tags: Aurangabad, Water, औरंगाबाद

पुढील बातम्या