मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : औरंगाबादच्या पाणीसंकटात जायकवाडीचा अडथळा, 3 महिने काम लांबणीवर

Aurangabad : औरंगाबादच्या पाणीसंकटात जायकवाडीचा अडथळा, 3 महिने काम लांबणीवर

औरंगाबादचा पाणीप्रश्न (Aurangabad Water Crises) सध्या संपूर्ण राज्यात गाजतोय. यावर्षी उत्तम पाऊस झाल्यानंतरही हा यावरील काम 3 महिने लांबणीवर राहणार आहे.

औरंगाबादचा पाणीप्रश्न (Aurangabad Water Crises) सध्या संपूर्ण राज्यात गाजतोय. यावर्षी उत्तम पाऊस झाल्यानंतरही हा यावरील काम 3 महिने लांबणीवर राहणार आहे.

औरंगाबादचा पाणीप्रश्न (Aurangabad Water Crises) सध्या संपूर्ण राज्यात गाजतोय. यावर्षी उत्तम पाऊस झाल्यानंतरही हा यावरील काम 3 महिने लांबणीवर राहणार आहे.

औरंगाबाद, 19 ऑगस्ट: औरंगाबादचा पाणीप्रश्न सध्या संपूर्ण राज्यात गाजतोय. या प्रश्नावर राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये खडाजंगी झाली होती. त्यानंतर शहराची तहान भागवण्यासाठी राज्य सरकारनं 1680 कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. पण, आता या योजनेत जायकवाडी धरणाचा (Jaykwadi Dam) अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे औरंगाबादकरांचा पाणीप्रश्न आणखी 3 महिने लांबवणीवर पडणार आहे. काय आहे प्रश्न? आशिया खंडामध्ये सर्वात वेगाने वाढणारी औद्योगिक वसाहत म्हणून देखील औरंगाबाद शहराचे नावलौकिक आहे.  वेगानं वाढणाऱ्या या शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.  उन्हाळ्यामध्ये दहा ते बारा दिवस आडपाणी येत असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना सर्वत्र  फिरावे लागले होते.  या पाणी प्रश्नाची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत झाली होती. औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1680 कोटी रुपयांची पाण्याची योजना जाहीर केली आणि या योजनेचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कोरोना काळात  हे काम संथगतीनं सुरू होतं मात्र आता त्याला वेग आला आहे. शहरातील 55 किलोमीटर त्यावर असलेल्या जायकवाडी धरणापर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. औरंगबाद शहराची लोकसंख्या जवळपास 16 लाख इतकी आहे. या लोकसंख्येसाठी 240 दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र शहरात पाणीसावण्यासाठी जलकुंभ नाही. सध्या 59 जलकुंभ असून यामधील 17 जलकुंभ वापरात आहेत. त्यामधून दिवसाला 135 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्याच्या दरम्यान 20 टक्के पाण्याची गळती होते. त्यामुळे शहराला मुबलक पाणी मिळत नाही. Ajanta Caves : गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण दाखवणारी लेणी, शिल्पकलेतील आश्चर्याचा पाहा VIDEO जायकवाडीचा अडथळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता अजय सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरण हे पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे या धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आले होते.  जायकवाडी धरणामध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे मुख्य जलस्त्रोतापासून मोठ्या पाईपलाईनपर्यंत गरजेनुसार पाणी काढण्याची व्यवस्था आहे. मात्र सध्या जायकवाडी धरणामध्ये 95 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा असल्यानं हे काम सध्या करणे शक्य नसल्याचे अभियंता अजय सिंग यांनी सांगितले.  हे काम सुरू होण्यास नोव्हेंबर महिना उजाडणार असल्यानं आणखी तीन महिने तरी औरंगाबाद शहराच्या पाण्याचा प्रश्न कायम राहणार आहे.
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Water crisis

पुढील बातम्या