मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Aurangabad Valuj Crime News : 3 महिन्यांपूर्वी पळून जाऊन केलं लग्न, भांडण झालं आणि अंजलीने संपवलं आयुष्य…,

Aurangabad Valuj Crime News : 3 महिन्यांपूर्वी पळून जाऊन केलं लग्न, भांडण झालं आणि अंजलीने संपवलं आयुष्य…,

औरंगाबाद शहराला लागून असलेल्या वाळुज औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद शहराला लागून असलेल्या वाळुज औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद शहराला लागून असलेल्या वाळुज औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

अविनाश कानडजे (वाळुज/औरंगाबाद), 31 जानेवारी : औरंगाबाद शहराला लागून असलेल्या वाळुज औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरातली आर एल 106 कनकधारा सोसायटी बजाजनगर येथे एका 21 वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ती विवाहितेने माहेरी आईच्या घरात छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल (दि. 30) रोजी दुपारी 1 च्या सुमारास उघडकीस आली. अंजली बिरेन्द्रसिंग गौतम (वय 21) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. ती मूळ उत्तर प्रदेश येथील कानपूरची रहिवाशी आहे. गेल्या 15 वर्षांपासून तीचे आईवडील बजाजनगर येथे वास्तव्यास आहेत. या दरम्यान चार वर्षांपूर्वी अंजलीच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने आई खाजगी कंपनीमध्ये काम करत होती. 

हे ही वाचा : नाशिक : मुलीच्या जन्माच्या दिवशीच बापाची आत्महत्या, सावकाराच्या जाचाने बाप, दोन मुलांनी संपवलं जीवन

अंजलीचे 9 नोव्हेंबर 2022 रोजी रोहित कारभारी आव्हाड, (वय 22) मोहटदेवी मंदिर बजाजनगर या मुलासोबत एका संस्थेमार्फत प्रेमविवाह विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित व अंजलीमध्ये वाद झाल्याने तीन दिवसापूर्वीं आईकडेच राहत होती. आज सकाळी बराच वेळ दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकाऊन बघितले असता अंजलीने गळफास घेतल्याचे लक्षात आले.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळुज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बेशुध्द आवस्थेत असलेल्या अंजलीस शासकीय घाटी रूग्णालयात दाखल केले. या दरम्यान डाॅक्टरांनी तपासनी केली असता मयत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.

भावाला कॉल करुन तरुणाचं टोकाचं पाऊल

औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मावस भावाला व्हिडिओ कॉल करून एका 29 वर्षीय तरुणाने तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : आई, वडिलांच्या भांडणात अल्पवयीन मुलीचा बळी, जे होवू नये तेच केलं

औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी भागात ही घटना परवा शनिवारी घडली. . मावस भावाला व्हिडिओ कॉल करून एका 29 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण मात्र समोर आलेले नाही. अमोल उत्तम खाडे (वय-29, रा.शाहूनगर, मुकुंदवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime, Crime news