मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Aurangabad Student Crime : तब्बल 9 लाखांचे डील करून करून डमी बसला परिक्षेला, पण एक चूक...

Aurangabad Student Crime : तब्बल 9 लाखांचे डील करून करून डमी बसला परिक्षेला, पण एक चूक...

नऊ लाख रुपयांच्या बदल्यात परीक्षेत डमी उमेदवार बनून गेला. मात्र या युवकास सुरक्षारक्षकाने परीक्षेदरम्यान हॉलमध्ये अंगझडती घेताना पकडले.

नऊ लाख रुपयांच्या बदल्यात परीक्षेत डमी उमेदवार बनून गेला. मात्र या युवकास सुरक्षारक्षकाने परीक्षेदरम्यान हॉलमध्ये अंगझडती घेताना पकडले.

नऊ लाख रुपयांच्या बदल्यात परीक्षेत डमी उमेदवार बनून गेला. मात्र या युवकास सुरक्षारक्षकाने परीक्षेदरम्यान हॉलमध्ये अंगझडती घेताना पकडले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

अविनाश कानडजे(औरंगाबाद) : नऊ लाख रुपयांच्या बदल्यात परीक्षेत डमी उमेदवार बनून गेला. मात्र या युवकास सुरक्षारक्षकाने परीक्षेदरम्यान हॉलमध्ये अंगझडती घेताना पकडले. त्यामुळे परीक्षेचा पेपर देण्याऐवजी त्याच्यासह परीक्षार्थीच्या हातात बेड्या पडल्याचा प्रकार शिपाईपदाच्या परीक्षेत घडला.

अविनाश सजन गोमलाडू असे या डमी विद्यार्थ्याचे नाव आहे तर विकास शाहूबा शेळके असे मुळ विद्यार्थ्याचे नाव आहे. या दोघांविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हे ही वाचा : चिमुकले मित्र कालव्याजवळ खेळत होते, अचानक एकाचा पाय घसरला अन्… पुण्यातील दुर्देवी घटना

दरम्यान डमी उमेदवार अविनाशची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 4 हजार रुपये किमतीचे एटीएम ट्रान्समीटर, ब्लूटुथ डिव्हाईस, मख्खी एअर फोन, मोबाइल आढळून आला. त्याशिवाय मूळ उमेदवाराची कागदपत्रेही अविनाशकडे सापडली आहे. हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो बाहेरुन प्रश्नाची उत्तरे मागविणार होता.

चिकलठाणा एमआयडीसी भागातील आयऑन परीक्षा सेंटरवर हा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थी मित्राच्या जागेवर परीक्षा देणाऱ्या डमी विद्यार्थी मित्राला एमआयडीसी सिडको पोलिसांनी 1फेब्रुवारी रोजी दुपारी अटक केली होती. तर ज्याच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी आला होता. त्या मूळ विद्यार्थी मित्राला 2 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली आहे.

एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, चिकलठाणा एमआयडीसीतील आयऑन डिजिटल झोनचे विभागीय व्यवस्थापक वैभव पवार पाटील यांनी याबाबत  फिर्याद दिली. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय सशस्त्र बलाच्या कॉन्स्टेबल, रायफल्समॅन आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये शिपाई पदाची परीक्षा आयऑन सेंटरमध्ये ऑनलाइन पद्धतीने होती.

हे ही वाचा : Aurangabad Valuj Crime News : 3 महिन्यांपूर्वी पळून जाऊन केलं लग्न, भांडण झालं आणि अंजलीने संपवलं आयुष्य…,

दरम्यान, आरोपी अविनाश याने विकासच्या नावावर परीक्षा हॉलमध्‍ये प्रवेश केला. मात्र, त्याची हालचाल संशयास्पद वाटत असल्याने त्याच्या प्रवेशपत्राची कसून तपासणी केली असता त्याने दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आल्याचे सांगितले.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime news