औरंगाबाद, 26 जानेवारी : यंदाचा प्रजासत्ताक दिन औरंगाबादकरांसाठी खऱ्या अर्थाने आगळावेगळा ठरला. शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबादमधल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सहा महिने आधी वेगळे झालेले दोन्ही गटांचे नेते पहिल्यांदाच शेजारी शेजारी बसले.
संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे यांना एका सोफ्यावर पाहून औरंगाबादकरांना आश्चर्याचा धक्का बसला. एकमेकांच्या बाजूला बसल्यानंतर या नेत्यांनी तोंडातून एक चकार शब्दही काढला नाही. पालकमंत्री संदीपान भुमरे प्रथेप्रमाणे भाषण संपवून मान्यवरांना शुभेच्छा द्यायला आले, पण चंद्रकांत खैरे शुभेच्छा न देता उठून गेले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रसंग सांभाळून घेतला. दोन्ही पक्षांचे नेते सोफ्यावर एकत्र आले असले तरी त्यांच्यातली कटुता कायम असल्याचं प्रकर्शानं जाणवलं.
प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये ठाकरे-शिंदे गट शेजारी-शेजारी, भुमरे येताच खैरेंचा काढता पाय#Shivsena #UddhavThackeray #EknathShinde pic.twitter.com/CVyt1CQrZV
— News18Lokmat (@News18lokmat) January 26, 2023
पालकमंत्री शुभेच्छा द्यायला आले तरी तुम्ही का निघालात? असा प्रश्न चंद्रकांत खैरे यांना विचारण्यात आला, तेव्हा ते घटनाबाह्य असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरे यांच्या या आरोपांवर संदीपान भुमरे यांनी पलटवार केला आहे. 'त्यांनी हा अपमान केला आहे. घटनाबाह्य पालकमंत्री म्हणण्याचे अधिकार यांना कुणी दिले? मला घटनाबाह्य ठरवणारे हे सुप्रीम कोर्ट आहेत का? खैरे काहीही बोलतात. सध्या जे चाललं आहे ते खैरैंना सहन होत नाही, पाहावलं जात नाही, म्हणून ते असं बोलतात. याआधीही ध्वजारोहण व्हायच्या आधी ते निघून गेले होते, त्यांना ही सवय आहे,' अशी टीका संदीपान भुमरे यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav Thackeray