मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गर्भवती प्राध्यापिकेने संपवलं जीवन! पती हॉस्पिटलबाहेर कार सोडून गेल्याने संशय

गर्भवती प्राध्यापिकेने संपवलं जीवन! पती हॉस्पिटलबाहेर कार सोडून गेल्याने संशय

गर्भवती प्राध्यापिकेने संपवलं जीवन!

गर्भवती प्राध्यापिकेने संपवलं जीवन!

सात महिन्यांच्या गर्भवती प्राध्यापिकेने गळफास घेतल्याने औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 4 फेब्रुवारी : सात महिन्याची गर्भवती असलेल्या 30 वर्षीय सहायक प्राध्यापिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शहरातील गारखेडा परिसरातील गजानन कॉलनी भागात घडली. घटनेनंतर महिलेच्या नातलगांनी सासरच्या लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी माहेरच्या लोकांनी घोषणाबाजी करत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन आंदोलन केलं. यामुळे काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

वर्षा दीपक नागलोत (वय 30 वर्ष, रा. गजानन कॉलनी) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. तर पती दीपक राजाराम नगलोत, सासरा राजाराम महाजन नगलोत, सासू देविका राजाराम नगालोत आणि नणंद वैशाली निखिल जरवाल, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सासरकडील मंडळींची नावे आहेत.

वाचा - विवाहित प्रेयसीवर खर्च करुन तरुण कर्जबाजारी; वसुलीसाठी मित्रांसोबत कांड केलं अन् गेला आत

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकत असताना 2012 मध्ये वर्षा यांची नातेवाईक असलेल्या दीपक नागलोत यांच्याशी ओळख झाली. त्यातून प्रेम जुळल्यावर त्यांनी प्रेमविवाह केला. दीपक खाजगी कंत्राटदार आहेत. या दाम्पत्याला 8 वर्षांचा मुलगा आहे. तर वर्षा सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलि कम्युनिकेशनमध्ये एमई करून सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा शुक्रवारी एमआयटी महाविद्यालयातून ड्युटीवरून परतल्या. त्यानंतर बेडरूमध्ये पंख्याला ओढणीच्या सह्याने गळफास घेतल्याचे सायंकाळच्या सुमारास उघड झाले. पती दीपकसह सासरकडील मंडळींनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यावेळी आणलेली दीपक यांची कार अपघात विभागासमोर सोडून ते निघून गेले. ही कार शनिवारी सकाळपर्यंत घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर उभी होती, असे नातेवाईकांनी सांगितले.

सासरचे छळ करत असल्याचा आरोप

दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या वर्षा यांना गेल्या वर्षांपासून सासरचा जाच होता. मात्र, प्रेमविवाह असल्याने त्या माहेरी काही सांगत नव्हत्या. सासरच्या जाचाला कंटाळून वर्षाने आत्महत्या केल्याचा आरोप मयत वर्षा यांच्या वडिलांनी शनिवारी केला आहे. या प्रकरणाची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप काळे करत आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Crime