औरंगाबाद, 15 सप्टेंबर : औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडून देणारी धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली आहे. (Aurangabad Police) चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याने सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद शहर हद्दीतील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वाघ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो औरंगाबाद ग्रामीण पोलिसात सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
संतोष वाघ याने सराफा व्यापाऱ्याला केंब्रिज चौकात अडवून पोलीस असल्याचा सांगत चौकशी करण्याच्या बहाण्याने अडवलं. त्यानंतर तब्बल 26 तोळे सोनं आणि साडेआठ लाख रुपये कॅश सराफा व्यापाऱ्याकडून लुटले. त्यानंतर सराफा व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दिली. अखेर पोलिसांनी संतोष वाघच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा : Ranveer Singh: न्यूड फोटोसोबत झालीय छेडछाड; पोलिसांसमोर रणवीर सिंहचा मोठा दावा
जळगावमध्ये पोलीस निरीक्षक निलंबीत
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी प्रकरणी एलसीबीचे प्रमुख किरणकुमार बकाले यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. बकाले यांना नियंत्रण कक्षात बदली केल्यानंतर रात्री उशीरा निलंबित करण्यात आले आहे.
मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी एलसीबीचे प्रमुख निरिक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री उशीरा बदली केली होती. दरम्यान, बुधवारी दिवसभरात मराठा समाजातील मान्यवरांसह सर्वसामान्यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत बकाले यांच्या निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
हे ही वाचा : राजकीय वादात पुणेकरांची ‘कोंडी’ चांदणी चौकातील पूल पाडण्याची वेळ का आली?
यात प्रामुख्याने आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवीद्रभैय्या पाटील, विनोद देशमुख आदी मान्यवरांचा समावेश होता. याबाबत एसपींकडे मागणी देखील करण्यात आली होती. या अनुषंगाने गुरुवारी रात्री उशीरा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी किरणकुमार बकाले यांच्या निलंबानाचे आदेश काढले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime news, Maharashtra police