मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

औरंगाबाद-पैठण रोडवर 20 मिनिटांत 25 अपघात; अनेकजणं जखमी

औरंगाबाद-पैठण रोडवर 20 मिनिटांत 25 अपघात; अनेकजणं जखमी

या घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

अविनाश कानडजे/औरंगाबाद, 6 ऑक्टोबर : औरंगाबाद-पैठण रोडवरील ढोरकीनजवळ एकामागून-एक दुचाकीचे अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. औरंगाबाद-पैठण रोडवर आज सकाळी 20 मिनिटांत 25 अपघात घडल्याचे पाहायला मिळाले. समांतर जलवाहिनीचे काम सुरू असल्याने रस्त्यावर माती आणि चिखल झाला आहे. रात्री झालेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला असून यामुळे अनेक दुचाकी घसरून पडल्या आहेत.

त्यामुळे आज सकाळी एकामागून-एक दुचाकी स्लीप होऊन अपघात झाले. ढोरकीन गावातील कुलस्वामिनी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या अक्षय हॉटेलजवळ हा प्रकार घडला. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला. काही नागरिकांनी रस्त्यावर गाड्या आडव्या लावून, संताप व्यक्त करत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.

प्रेमात झाला धोका, तरुण रेल्वेवर चढला आणि हायहोल्टेज तारेला पकडलं, पुण्यातला VIDEO

नागरिकांचा संताप पाहत कंत्राटदाराने रस्त्यावरील चिखल जेसीबीच्या साह्याने दूर केले. त्यानंतर अखेर वाहतूक सुरुळीत करण्यात आली आहे. या घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहे. त्यामुळे राडारोडा रस्त्यावर येत असून पावसामुळे ठिकठिकाणी चिखल जमा झाला आहे. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

First published:

Tags: Aurangabad News, Crime news, Road accident