सुशील राऊत,प्रतिनिधी
औरंगाबाद, 24 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. यामुळे तापमानात वाढ झाली आहे. उन्हामुळे मानवी शरीराची जसी लाहीलाही होते त्याच प्रमाणे जनावरांनाही वाढत्या उन्हाचा त्रास हा होतोच. वाढलेल्या तापमानाचा जनावरांच्या दुग्धोत्पादन व आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतात. उष्ण वातावरणात जनावरे चारा कमी खातात. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते,वाढ खुंटते व वजन कमी होते. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी या संदर्भात औरंगाबाद जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वल्लभ जोशी यांनी सल्ला दिला आहे.
कशी घ्यावी काळजी?
उन्हाळ्यात जनावरांना सकाळच्या वेळीच चारा टाकावा. दुपारच्या वेळी जनावरांना आराम करायची इच्छा असते. त्यात दुधाळ जनावरं दुपारच्या उन्हात सावलीत आराम करणं पसंत करतात. गाई-म्हशी दूध कमी देत असतील तर दुपारच्या वेळी त्यांच्या अंगावर पाण्याचा शिडकाव करावा कारण त्यामुळे शरीर गार राहायला मदत होईल. शक्य असेल तर जनावरांना हिरवा चारा द्यावा, असं डॉ. वल्लभ जोशी सांगतात.
दुपारच्या वेळी कामाला जंपू नये
याच बरोबर बैलांना उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी कामाला जंपू नये. उन्हाळ्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यस्थित करणे गरजेचे आहे .लाळ खुर्द आजाराची लक्षणे जनावरांमध्ये दिसू शकतात. यासाठी शासनाने लस उपलब्ध केली असून शेतकरी व नागरिकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन जोशी यांनी केले.
वातावरणातल्या बदलांचा आंब्याच्या झाडांना धोका! नुकसान टाळण्यासाठी 'ही' घ्या काळजी, Video
काळजी घेणे आवश्यक
आपण उन्हाळ्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या स्वतःची काळजी घेतो. त्याचप्रमाणे आपल्या जनावरांची देखील काळजी घेणे आवश्यक असतं. उन्हापासून जनावरांना सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना उन्हापासून जनावरांची काळजी कशी घ्यायची याबद्दल काही शंका असेल तर पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन माहिती घेवू शकता असंही जोशी यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Farmer, Local18