अविनाश कानडजे (औरंगाबाद), 04 डिसेंबर : औरंगाबाद शहरात खुनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या घटनेने औरंगाबाद शहर हादरले होते. दरम्यान ही घटना ताजी असताना दुसरी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मदतीसाठी एकाने उसने पैसे दिले होते हे पैसे चारचौघात का मागितले म्हणून थेट खून करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका मोठा असल्याने तालुक्यात पैशाची मोठी उलाढाल होत असते. यामुळे पैशाची देवाण घेवाणही याठिकाणी होत असते. दरम्यान यातून उसणे दिलेले पैसे चार चौघात मागितल्याच्या राग आल्याने सागर संतोष जैस्वाल या 21 वर्षीय तरूणाचा खून केल्याची घटना कन्नड तालुक्यात उघडकीस आली आहे.
हे ही वाचा : Shocking! नवरदेवाला वरमाळा घालताच भयानक घडलं; लखनऊमध्ये नवरीचा स्टेजवरच मृत्यू
तर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मृत तरुण बेपत्ता असल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. दरम्यान कन्नड तालुक्यातील औराळा येथील पेडकवाडी घाटातील पाईपमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना जेरबंद केले आहे.
औरंगाबाद बलात्काराच्या घटनेने हादरले
राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यातून हत्या, आत्महत्येच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता औरगाबादमधूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मानलेल्या मामाने 22 वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : पतीला सोडून बहिणीसोबत हनिमूनला गेली नवरी; संपूर्ण सत्य समजताच नवरदेवाची पोलिसांत धाव
काय आहे संपूर्ण प्रकरण -
ही संतापजनक घटना गंगापूर तालुक्यातील पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे घडली. या घटनेनंतर आरोपी रामहरी भागण चिकने (वय 35, रा. दायगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याप्रकरणी आरोपी रामहरी भागण चिकने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संतापजनक प्रकार 24 नोव्हेंबरला घडला आहे. यानंतर तो 26 नोव्हेंबरला उघडकीस आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, Murder, Murder news