मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खबरदार! अनधिकृतपणे झाड तोडल्यास होणार 1 लाख रुपयांचा दंड

खबरदार! अनधिकृतपणे झाड तोडल्यास होणार 1 लाख रुपयांचा दंड

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

औरंगाबाद शहरातील झाडांची अनधिकृतपणे तोड केल्यास संबंधित व्यक्तीला 1 लाख रुपयांचा दंड महापालिका प्रशासन करणार आहे.

औरंगाबाद, 20 सप्टेंबर : आशिया खंडात सर्वात वेगात वाढणारी औद्योगिक वसाहत म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. यामुळे या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. यामुळे शहराचा विकास होत आहे. शहरात घरांचे प्रमाण वाढत असल्यामुळे वृक्षतोड तोड होत आहे. मात्र, आता शहरातील झाडांची अनधिकृतपणे तोड केल्यास संबंधित व्यक्तीला 1 लाख रुपयांचा दंड महापालिका प्रशासन करणार आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरांमध्ये औद्योगिक वसाहत व रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्यामुळे शहरांमध्ये येऊन राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे शहराचा विस्तार होत आहे. काही वर्षांपासून शहरातील झाडांची सरासपणे तोड होत होती. महापालिका वृक्ष प्राधिकरनाणी नोटीस बजावूनही झाडांना तोडले  जात असे. आता मात्र महापालिकेने वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम मधील सुधारणानुसार झाडांची तोड करणाऱ्याला  1 लाख रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. हेही वाचा : मुसळधार पावसादरम्यान आभाळातून कोसळलं मोठं संकट; 23 जणांनी गमावला जीव 'नागरिकांनी वृक्षतोडी संदर्भात जागृत व्हावे' नागरिकांनी वृक्षतोडी संदर्भात जागृत व्हावे नागरिकांना झाड तोडायचे असेल तर त्यांनी महानगरपालिकेत अर्ज करून परवानगी घ्यावी. अनधिकृतपणे जर झाड तोडल्यास त्याच्यावरती 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे, असं उद्यान अधीक्षक महापालिका विजय पाटील यांनी सांगितलं आहे. पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाते. महापालिकेकडूनही दरवर्षी पावसाळ्यात वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात येतो. परंतु याचवेळी काही जणांकडून झाडे तोडण्याचे सत्र सुरु आहे. झाडांची कत्तल थांबवण्यासाठी 1975 साली वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम अस्तित्वात आला. त्यानुसार शहराच्या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाची तरतूद करण्यात आलेली आहे. हेही वाचा : aurangabad water management : गंमतच झाली एका उंदराने चक्क ‘या’ स्मार्ट सिटीचा पाणीपुरवठा केला बंद 'वृक्षतोडी संदर्भात देऊ शकता माहिती'  पर्यावरण प्रेमींना जर वृक्षतोडी संदर्भात माहिती द्यायची असेल तर औरंगाबाद महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला तुम्ही माहिती देऊन संबंधित वृक्षतोडी संदर्भात माहिती देऊ शकता. यामध्ये तुम्ही अर्जही करू शकता किंवा एसएमएस किंवा फोनद्वारे देखील माहिती स्वीकारली जाते. 9404000034 या क्रमांकवर तुम्ही माहिती देऊ शकता.
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News

पुढील बातम्या