मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चिमुकलीला टीव्हीवर कार्टून लावून देत आईनं संपवलं जीवन; मृतदेहाशेजारी मुलगीही..

चिमुकलीला टीव्हीवर कार्टून लावून देत आईनं संपवलं जीवन; मृतदेहाशेजारी मुलगीही..

विवाहित महिलने गळफास घेऊन संपवलं जीवन

विवाहित महिलने गळफास घेऊन संपवलं जीवन

औरंगाबादच्या शिवाजीनगर परिसरात 20 वर्षीय विवाहित महिलने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Rahul Punde

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 24 जानेवारी : पती नोकरीवर आणि सासूसासरे बाहेर गेल्यानंतर विवाहितेने 2 वर्षांच्या मुलीला टीव्हीवर कार्टून लावून देत बेडरूममध्ये गळफास घेतल्याची घटना घडली आहे. आपली आई खूप वेळ झाला तरी दिसली नाही म्हणून मुलगी रडत राहिली, त्यानंतर शेजारच्यांनी येऊन पाहिले असता रूपाली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ही घटना औरंगाबाद शहरातील आनंदनगर भागात समोर आली. रुपाली मयूर गायकवाड (वय 20 वर्ष, रा. आनंदनगर गल्ली क्र. 4, शिवाजीनगर) असं मृत विवाहितेचं नाव आहे.

मुलीच्या सततच्या रडण्याने शेजारी आल्याने घटना उघड

या प्रकरणी नातेवाईक आणि पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मृत रुपालीने पती मयूरसोबत जेवण केले. त्यावेळी ती आनंदी होती, असं मयूरने सांगितलं. जेवण झाल्यानंतर मयूर नोकरीवर निघून गेला. दरम्यान सासू आणि सासरे देखील दुकानावर गेले. 2 वर्षीय चिमुकली आकांक्षा आणि रुपाली या दोघीच घरात होत्या. दरम्यान रुपालीने वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये आकांक्षाला टीव्हीवर कार्टून लावून दिले आणि ती खाली बेडरूममध्ये आली. बेडरूममध्ये स्कार्फने तिने गळफास घेतला. बराच वेळ उलटून देखील आई दिसत नसल्याने चिमुकली खाली बेडरूममध्ये आली व आईजवळ रडत बसली. बराच वेळ मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला असता रुपालीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर पोलिसांनाही याबाबत कळवण्यात आलं. पोलिसांनी मृतदेह फासावरून खाली उतरवत रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासून रुपालीला मृत घोषित केले.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

या घटनेनंतर कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. कारण, घरात कुठलाही वाद नसताना आणि मृत्यूपूर्वी काही काळ आधीच पतीसह आनंदाने जेवण करणाऱ्या रुपालीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Crime