Home /News /maharashtra /

Aurangabad CCTV: मुलाला कामावरुन काढल्याने बाप संतप्त, रागाच्याभरात मित्रांसह रुग्णालयावर दगडफेक अन् तोडफोड

Aurangabad CCTV: मुलाला कामावरुन काढल्याने बाप संतप्त, रागाच्याभरात मित्रांसह रुग्णालयावर दगडफेक अन् तोडफोड

CCTV: मुलाला कामावरुन काढल्याने बाप संतप्त, रागाच्याभरात मित्रांसह रुग्णालयावर दगडफेक अन् तोडफोड

CCTV: मुलाला कामावरुन काढल्याने बाप संतप्त, रागाच्याभरात मित्रांसह रुग्णालयावर दगडफेक अन् तोडफोड

Aurnagabad News: औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात तोडफोड आणि दगडफेक करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

औरंगाबाद, 22 मे : एका खाजगी रुग्णालयात तोडफोड (hospital vandalised) आणि दगडफेक (Stone pelting on hospital) झाल्याची घटना औरंगाबाद (Aurangabad)मध्ये घडली आहे. औरंगाबादमधील बजाजनगर परिसरात ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना रुग्णालयाबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आपल्या मुलाला कामावरुन काढल्याच्या रागातून संतप्त झालेल्या वडिलांनी मित्रांसोबत ही तोडफोड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील या खाजगी रुग्णालयात कामावर असलेल्या एका मुलाला कामावरुन काढण्यात आले. त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी रागाच्या भरात आपल्या मित्रांसोबत एकत्र येत रुग्णालयात तोडफोड केली. इतकेच नाही तर दगडफेक सुद्धा केली आहे. या प्रकरणी औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. औरंगाबादेत विद्यार्थीनीची हत्या औरंगाबाद शहरात भरदिवसा विद्यार्थिनीचा खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील देवगिरी कॉलेज परिसरात ही घटना घडली. विद्यार्थिनीला कॉलेजपासून 200 फूट ओढत नेत तिची सुऱ्याने भोसकून हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र भर दिवसा कॉलेजमधील विद्यार्थिनीची अशा प्रकारे हत्या केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा सवाल उपस्थित केला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने कॉलेजमधील विद्यार्थिनीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. तरी पोलीस आरोपीचा शोध घेत असून लवकरच या प्रकरणात अटक करणार असल्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. या घटनेनंतर आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात एक मुलगा विद्यार्थिनीला ओढून नेत असताना दिसत आहे. विद्यार्थीनीच्या हत्येमुळे  औरंगाबादेत खळबळ उडाली आहे. पुण्यातील तरुणाची नाशिकमध्ये निर्घृण हत्या, हत्याकांडाचा LIVE VIDEO आला समोर दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या पूर्णिमा बस स्टॉप परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लुटमारीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्येची ही घटना घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हरीश पटेल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. हत्या झालेला हरीश पटेल हा युवक पुणे येथील राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Aurangabad, Cctv, Crime news

पुढील बातम्या