Home /News /maharashtra /

औरंगाबाद ग्रामपंचायतीमध्ये बंडखोरांचच वर्चस्व; शिवसेनेला धक्का देत मोठी बाजी

औरंगाबाद ग्रामपंचायतीमध्ये बंडखोरांचच वर्चस्व; शिवसेनेला धक्का देत मोठी बाजी

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरांकडून पक्षाला छोबीपछाड...

औरंगाबाद, 5 ऑगस्ट : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. सर्वच ठिकाणी सेना बंडखोर आणि शिवसेना अशीच चुरस होती. या चुरसीच्या लढतीत बंडखोर आमदारांनीच शिवसेनेला झटका देत वर्चस्व सिद्ध केलं आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, पैठणचे आमदार संदीपन भुमरे आणि औरंगाबादचे आमदार संजय सिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केले. त्यावेळी सेनेच्या मोठ्या नेत्यांनी या तिघांना पुन्हा निवडून येऊन दाखवा असे आव्हान दिलं आहे. या तिन्ही आमदारांनी आपापल्या मतदार संघातील ग्रामपंचायतीवर शिवसेनेला धूळ चारत आपल्या मतदार संघात मजबूत असल्याचे सिद्ध केलं आहे. औरंगाबाद जिल्हयात सर्वात मोठी ग्रामपंचायत संजय शिरसाट यांच्या मतदार संघात होती. वडगाव कोल्हाटी या ग्राम पंचायतीमध्ये संजय शिरसाट यांच्या गटाने 17 पैकी 11 जागा आपल्या ताब्यात घेतल्या आणि ग्रामपंचायत सेनेकडून खेचली. शिवसेनेला केवळ चार जागा राखता आल्या. मतमोजणी केंद्रावर आलेल्या संजय सिरसाट यांच्या पत्नी यावेळी भावनिक झाल्या. शिवसेनेनं सिरसाट यांना गद्दार म्हटले पण लोक आमच्यासोबत आहेत हे बघून भावना आवरता आल्या नाहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांची मुलगी म्हणाली, हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदार संघावर एकहाती अब्दुल सत्तार यांची पकड आहे. त्यांच्याच पॅनलने तिन्ही ग्रामपंचायतीवर एकसाथ कब्जा केला आहे. सिल्लोड तालुक्यातील तीन ग्रामपंचायती उपळी, जंजाळा व नानेगाव तीनही ग्राम पंचायतवर आमदार अब्दुल सत्तार यांचे एकहाती वर्चस्व कायम राहिले सेनेला हाती काहीच लागले नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद सिल्लोड पाठोपाठ पैठणचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांनीही आपली जादू कायम ठेवली आहे. पैठण मतदार संघातील 7 पैकी 6 ग्रामपंचायती वर आपलाच भगवा कायम ठेवला असून शिवसेनेला हाती काही लागू दिले नाही. ग्रामपंचायत निवडणूक ही मोठ्या निवडणुकीचा पाया भक्कम करणारी असते. पक्षाचे आणि पक्षाच्या चिन्हांचे फार महत्व या निवडणुकीत नसते. मात्र या तिन्ही बंडखोर आमदारांनी काही प्रमाणात का होईना आपले मतदार संघातील बंडखोरी नंतरही पकड कमी झाली नसल्याचं दिसून येत आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Aurangabad News, Eknath Shinde, Election, Shivsena

पुढील बातम्या