मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : लहान मुलांमध्ये भाजण्याचे प्रमाण जास्त! अशी घ्या काळजी

Aurangabad : लहान मुलांमध्ये भाजण्याचे प्रमाण जास्त! अशी घ्या काळजी

भाजण्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यामध्ये 12 वर्षांखालील लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. ( फोटो सौजन्य सोशल मीडिया )

भाजण्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यामध्ये 12 वर्षांखालील लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. ( फोटो सौजन्य सोशल मीडिया )

भाजण्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यामध्ये 12 वर्षांखालील लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 24 सप्टेंबर : भाजण्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत 12 वर्षांखालील लहान मुलांचे भाजण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घरातील कामामध्ये व्यस्त राहणाऱ्या कुटूंबीयांनी लहान मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यामध्ये मागील 20 महिन्यामध्ये 138 भाजण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये 12 वर्षांखालील लहान मुलांचा समावेश आहे.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची रेलचेल असते. यामध्ये जिल्ह्यामधील विविध भागातील नागरिक उपचारासाठी येत असतात. यामध्ये भाजलेल्या रुग्णांचा देखील समावेश असतो. घाटी रुग्णालयामध्ये विविध कारणांनी भाजल्या जाणाऱ्या रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार केले जातात. गेल्या 20 महिन्यामध्ये या ठिकाणी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये 12 वर्षांखालील मुलांची संख्या असून 138 भाजण्याच्या घटना समोर आल्या आहेत, अशी माहिती घाटी सर्जरी विभाग प्रमुख डॉ.सुरेश हडबडे यांनी दिली असून या बाबतीत पालकांनी मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे 80% महिलांना समजतच नाही, या 3 कारणांमुळे वाढतो धोका

कोणत्या कारणांमुळे भाजतात चिमुकले 

गरम पाणी अंगावर पडणे, अंगावर गरम भाजी पडणे, अंगावर गरम दुध पडणे, खेळताना भाजणे,  गॅसवर पडल्यामुळे, फटाके उडविताना इत्यादी कारणांमुळे लहान मुलांमध्ये सर्वाधिक भाजण्याचे प्रमाण असल्याचे डॉक्टर सांगतात.

भाजण्याच्या घटना टाळण्यासाठी अशी घ्या मुलांची काळजी 

मुलांना किचन पासून दूर ठेवा. त्यासोबतच लहान मुलांना आगी बद्दल जागरूक करून त्यांना याबद्दल माहिती देणे गरजेचे आहे. बऱ्याचदा लहान मुलांना आगी बद्दल माहित नसल्यामुळे खेळण्याच्या उद्देशाने त्यांचे लक्ष त्याकडे जाते आणि त्यातून हे प्रकार घडतात. त्यामुळे पालकांनी मुलांना आगी बद्दल माहिती देणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  Popcorn Benefits : हलकेफुलके पॉपकॉर्न तुमचंही वजन कमी करतात; इतरही आश्चर्यकारक फायदे

लहान मुलांमध्ये वरील भाजण्याची कारण आहेत. पालकांनी याबाबतीत जागरूक राहिल्यास लहान मुलांमध्ये भाजण्याच्या घटना टाळता येऊ शकतात,असं घाटी सर्जरी विभाग प्रमुख डॉ.सुरेश हडबडे सांगतात.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News