मुंबई, 7 डिसेंबर : राज्याच्या सीमा भागातील नागरिक मुलभूत सुविधा मिळत नसल्यानं आपल्या गावांचा इतर राज्यांमध्ये समावेश करावा, अशी मागणी करत आहेत. हे प्रकरण तापलेलं असताना आता त्यामध्ये औरंगाबाद शहरातल्या पत्नी पीडित संघटनेनंही उडी मारली आहे. या संघटनेच्या अधिकाऱ्यांनीही आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.
काय आहे मागणी?
'महिलांप्रमाणे पुरुषांवरही अत्याचार होतात. या प्रकरणांच्या घटनांमध्ये आता वाढ झालीय. महिलांवर अत्याचार झाला तर त्यांना महिला आयोगाकडे दाद मागता येते. पुरुषांना असा कोणाताही पर्याय नाही. त्यांना समाज समजून घेत नाही. समाजाच्या दुर्लक्षामुळे पुरुषांवरील अन्याय वाढतोय. गेल्या 7 वर्षांमध्ये 10 हजार 763 पत्नी पीडित पुरुष आमच्या संघटनेत सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्रात पुरुष अबला आहेत. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही कर्नाटकात जाऊ असा इशारा पत्नी पीडित संघटनेनं दिला आहे. #Maharashtra #Karnataka #Local18 #Aurangabad #News18Lokmat pic.twitter.com/6UuJTl9bQB
— News18Lokmat (@News18lokmat) December 7, 2022
पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाला आळा बसण्यासाठी पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी आम्ही वारंवार केली आहे. ही मागणी एका महिन्याच्या आत मान्य झाली नाही तर आम्ही कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे,' असा इशारा पत्नी पीडित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत फुलारे यांनी दिला आहे.
पुरुषांवरही होतात अत्याचार! पाहा काय आहे 'त्यांची' मागणी, Video
काय आहे संघटना?
औरंगाबादच्या भारत फुलारे यांनी पत्नी पीडित पुरुषांसाठी ही संघटना स्थापन केली आहे. पत्नीकडून छळ सहन करणारा पीडित पती संघटनेचा सभासद होऊ शकतो. या सदस्यांना संघटनेकडून कायदेशीर मदत केली जाते. पत्नीकडून होणाऱ्या अन्यायाकडं लक्ष वेधण्यासाठी या संघटनेकडून वट सावित्रीच्या एक दिवस आगोदर पिंपळाला 108 उलट्या फेऱ्या मारल्या जातात. तसंच पुरुष दिनाला कावळ्याची पूजा केली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18, Wife and husband