मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad Crime : दोन दिवसांपूर्वी पतीसोबत भांडण झालं अन् पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळला शेतात

Aurangabad Crime : दोन दिवसांपूर्वी पतीसोबत भांडण झालं अन् पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळला शेतात

औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील शिवराई येथे शेतात 19 वर्षीय महिला आणि 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Aurangabad Crime)

औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील शिवराई येथे शेतात 19 वर्षीय महिला आणि 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Aurangabad Crime)

औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील शिवराई येथे शेतात 19 वर्षीय महिला आणि 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Aurangabad Crime)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

औरंगाबाद, 28 सप्टेंबर : औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील शिवराई येथे अशोक बाबासाहेब डिके यांच्या शेतात 19 वर्षीय महिला आणि 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचे कुटुंब हे मध्य प्रदेश येथून कामासाठी वैजापूर येथे आले होते. दोन दिवस आदि या महिलेचे पतीसोबत भांडण झाले होते तेव्हापासून महिला आणि मुलगा बेपत्ता होते. आज त्यांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला संगीता रवींद्र सोळंके आणि रणजीत रवींद्र सोळंके असे मृत आई आणि मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मागच्या दोन दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील शिवराई येथील एका दाम्पत्याचे भांडण झाले होते. दरम्यान कोणत्या कारणावरून भांडण झाले होते हे समजू शकले नाही. दरम्यान भांडण झालेल्या दिवसापासून पत्नी आणि मुलगी गायब होते. मागच्या दोन दिवसांपासून शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह शेतात आढळले. त्या दोघांनी आत्महत्या केली की घातपात याबाबत अजूनही माहिती समोर आली नाही.

हे ही वाचा : नवरात्रीत भगरीचे विघ्न, औरंगाबादमध्ये 500 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा

औरंगाबादमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणात वाढ

इंस्टाग्रमावर ओळख झालेल्या विवाहितेचा पाठलाग करत तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्या असे म्हणत अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणा विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मयूर भागवत धनावडे असे आरोपीचे नाव आहे. एका विवाहितेची इंस्टाग्रामवर मयुर सोबत ओळख झाली होती. या ओळखीतून तो विवाहितेचा सतत पाठलाग करीत होता.

विवाहितेचे आरोपीस बोलण्याची इच्छा नसतानाही त्याने पाठलाग सुरुच ठेवला. आरोपीने विवाहितेकडे जाऊन, तू माझ्याशी का बोलत नाही, मी तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्या, असे म्हणत विवाहितेला स्वत:जवळ ओढून घेत अश्लिल वर्तन केले. तेव्हा विवाहितेने आरोपीला विरोध केला असता, त्याने शिविगाळ केली.

हे ही वाचा : शाळा सुटली अन् 13 वर्षांची श्रद्धा जीवाला मुकली, घरी येताना ट्रॅक्टरखाली सायकल सापडली

तसेच तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुला व तुझा पती, मुलगा आणि आई वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सिडको पोलीस करीत आहेत. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास एन 5 सिडकोतील गुलमोहर कॉलनी येथे आरोपीने विवाहितेकडे जाऊन म्हणाला, तू माझ्याशी का बोलत नाही, मी तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्या, असे म्हणत विवाहितेला स्वत:जवळ ओढुन घेत अश्लिल वर्तन केले.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime news, Murder news, Suicide news