मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad Crime News : धक्कादायक! गुप्त धनासाठी दारू पाजून जादूटोणा करत जाळलं, पुढं भयानक घडलं

Aurangabad Crime News : धक्कादायक! गुप्त धनासाठी दारू पाजून जादूटोणा करत जाळलं, पुढं भयानक घडलं

औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाला आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाला आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाला आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

अविनाश कानडजे (औरंगाबाद), 08 डिसेंबर : औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाला आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी भर चौकात खून केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एका नवी घटनेने औरंगाबाद शहर हादरले आहे.

औरंगाबादमध्ये गुप्त धन काढण्यासाठी 3 जणांनी तरुणाला दारू पाजून विवस्त्र मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भगवान खरात याला धन काढण्यासाठी विवस्त्र करून त्याच्यावर जादूटोणा करून मारहाण करण्यात आली. तर त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा : Aurangabad Crime : चारित्र्याचा संशय, भर चौकात पत्नीच्या डोक्यात घातले फावडे, औरंगाबादमधील घटना

यामध्ये भगवान याचा एक पाय निकामी झाला असून, तरुण अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. वदोड बाजार पोलीस ठाण्यात तरुणांच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

जबरदस्तीने औषध‌ पाजत खून

किडनॅप झालेल्या मुलाची आमच्या विरुद्ध खोटी तक्रार का दिली, असे विचारले असता भांडण झाले. या भांडणांत डोक्यात दगडाने मारून, जबरदस्तीने औषध पाजत खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करून केली मारहाण, औरंगाबाद हादरलं

ही धक्कादायक घटना कोपरावर शिवराई वाळूज गाव येथे घडली आहे. भांडण झाल्यानंतर आरोपींनी रमेश काळे यांना धरुन काहीतरी औषध पाजून तेथून पळून गेले. त्यानंतर रमेश काळे यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालू असताना रमेश बबन काळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल 5 तारखेला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. रमेश बबन काळे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime, Crime news