मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : औरंगाबादमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी, कॅनॉट परिसरात भीतीचे अन् तणावाचे वातावरण, VIDEO Viral

Aurangabad : औरंगाबादमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी, कॅनॉट परिसरात भीतीचे अन् तणावाचे वातावरण, VIDEO Viral

औरंगाबादेत दोन गटांत तुंबळ हाणामारी, परिसरात तणावाचे वातावरण, VIDEO Viral

औरंगाबादेत दोन गटांत तुंबळ हाणामारी, परिसरात तणावाचे वातावरण, VIDEO Viral

Aurangabad news : औरंगाबादमधील कॅनॉट गार्डन बाजारपेठमध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे.

औरंगाबाद, 27 नोव्हेंबर : शहरातील कॅनॉट गार्डन बाजारपेठेत रात्रीच्या सुमारास तरुणांचा धुडगूस पहायला मिळाला. तरुणांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी (clash between two groups in Aurangabad) झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल (video viral) होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (clash between two groups in Connaught garden market area in Aurangabad)

हाणामारीत चार जण जखमी

प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादमधील कॅनॉट परिसरात अचानक दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात दिसत आहे की, जवळपास 20 ते 30 जण या धुडगूसात सहभागी होते. दोन गटांत झालेला वाद इतका वाढला की, हाणामारी झाली. या हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत.

हॉटेलमध्ये कांदा मागण्यावरुन वाद?

औरंगाबादमधील या हाणामारीच्या घटनेमागचं कारण अद्याप समोर आलेले नाहीये. असं म्हटलं जात आहे की, हॉटेलमध्ये कांदा मागण्यावरुन हा वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, मग सुरुवातीला बाचाबाची झाली आणि मग दोन गटांत हाणामारी सुरू झाली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वाचा : बीडमध्ये एकाच नंबरच्या सापडल्या 9 ऑटोरिक्षा, पोलीस हैराण

नालासोपाऱ्यात दोन गटांत हाणामारी

ऑक्टोबर महिन्यात नालासोपाऱ्यात तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती. नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे ट्रॅक जवळ असलेल्या यशवंत विवा मॉल टाऊनशिप जवळ ही घटना घडली होती. दोन गटात झालेल्या हाणामारीचा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोसोयटीच्या जागेचा बोर्ड लावण्याच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत होतं की, हातात लाठी-काठी घेऊन जमावाने एकाला बेदम मारहाण करत आहेत. या घटनेत आचोले पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून 2 जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली.

वाचा : पोलिसांच्या तावडीतून सुटला पण मृत्यूनं गाठलं; स्वत:च्या चुकीमुळे तरुणाचा गेला जीव

पिंपरीत Wine Shop चालक आणि ग्राहकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

वाईन शॉपमध्ये आलेल्या ग्राहकांमध्ये आणि वाईन शॉप चालकात झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाली आहे. पिंपरीतील रिगल वाईन्स शॉपमध्ये झालेली फ्री स्टाईल हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ग्राहकांनी वाईन शॉपमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करत दुकानाचीही तोडफोड केली आहे. 700 रुपयांपेक्षा जास्त किमतीची दारू दुकानदाराला मागत असल्याने, झालेल्या वादात ही मारहाण आणि तोडफोड करण्यात आली आहे. दारुड्यांनी हातात लोखंडी पाइप घेऊन रिगल वाईन्सची तोडफोड केली आहे.

वाईन शॉप मालकाला दारुडे मारहाण करत असल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तर दारुडे दुकानाबाहेर तोडफोड करत असतानाची दृश्य रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहेत. पिंपरी - चिंचवड शहरातील अशोका थिएटर जवळील रिगल वाईन्समध्ये ही मारहाण आणि तोडफोडीची घटना घडली.

First published:

Tags: Aurangabad, Crime, Shocking viral video