मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad crime : घरात घुसून वृ्द्ध महिलेचा खून, पुरावाही नाही, पण तरीही मारेकरी पकडला

Aurangabad crime : घरात घुसून वृ्द्ध महिलेचा खून, पुरावाही नाही, पण तरीही मारेकरी पकडला

औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकिन येथील नवीन गावठाण परिसरात घरात एकट्या राहत असलेल्या वृद्ध महिलेचा खून करण्यात आला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकिन येथील नवीन गावठाण परिसरात घरात एकट्या राहत असलेल्या वृद्ध महिलेचा खून करण्यात आला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकिन येथील नवीन गावठाण परिसरात घरात एकट्या राहत असलेल्या वृद्ध महिलेचा खून करण्यात आला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

अविनाश कानडजे (औरंगाबाद), 20 नोव्हेंबर : औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकिन येथील नवीन गावठाण परिसरात घरात एकट्या राहत असलेल्या वृद्ध महिलेचा खून करण्यात आला होता. जानकाबाई हरदास महालकर असे त्या वृद्ध महिलेचं नाव होते. जानकाबाई यांचा खून करून दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली. त्यामुळे गाजलेल्या वृद्धेच्या खुनाचा उलगडा झाला आहे.

बिडकीनमधील गावठाण भागात 8 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जानकाबाई महालकर यांचा खून झाला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत यंत्रणा तैणात केली होती. ठसेतज्ज्ञ, श्वान पथक, परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मोबाइल टावर लोकेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी झडती, नातेवाइकांची चौकशी या सर्व बाबी करूनही या खुनाचा उलगडा करण्यासाठी धागेदोरे मिळत नव्हते.

हे ही वाचा : भंडारा: घरात घुसून मुलीला मारहाण करत गाठला क्रूरतेचा कळस; अखेर 5 वर्षांनी आरोपीला घडली अद्दल

या घटनेचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पथकास घरफोडी करणाऱ्या टोळीतील राजू छबूराव साळवे (रा. कातपूर, ता पैठण), दिलीप गोपीचंद हिवाळे (रा. जायकवाडी), शिवाजी सुखदेव खरात (रा. पिंपळवाडी, ह. मु. रमानगर, चित्तेगाव), देवीदास ऊर्फ बाली सर्जेराव गलाटे (रा. ववा, ता. पैठण, ह. मु. पांगरा रोड, चितेगाव) यांनी खून केल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार चौघांना ताब्यात घेतले असता, त्यांनी खुनाची कबुली दिली. या चोरट्यांनी तीन महिन्यांपूर्वी औरंगाबादेतील शिवाजीनगर, चित्तेपिंपळगाव येथे वृद्ध महिलेला अडवून गळ्यातील सोन्याचे दागिने लुटल्याची कबुलीही त्यांनी दिली. यमध्ये अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनात स्था. गु. शाखेचे निरीक्षक रामेश्वर रेंगे.

हे ही वाचा : धक्कादायक! आधी लग्नाचे आमिष नंतर अत्याचार, धर्मांतरासाठी तरुणीवर दबाव टाकणाऱ्या आरोपीला बेड्या

बिडकीनचे सपोनि संतोष माने, उपनिरीक्षक महेश घुगे, विजय जाधव, प्रदीप ठुबे, सुजाता गुंजाळ, हवालदार सय्यद झिया, बाळू पाथ्रीकर, दगडु जाधव, श्रीमंत भालेराव, संतोष पाटील, संजय घुगे, दीपेश नागझरे, नामदेव सिरसाट, प्रमोद खांडेभराड, लहू थोटे, जनाबाई चव्हाण, वाल्मीक निकम, नरेंद्र खंदारे, विजय धुमाळ, गणेश गांगवे, शेख नदीम, दीपक सुरोशे, उमेश बकले, परमेश्वर आडे, पुष्पांजली इंगळे, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मोठें, राहुल गायकवाड, आनंद घाटेश्वर, संतोष डमाळे, संजय तांदळे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News