मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये नशेखोर तरूणाचा राडा, चौघांच्या डोक्यात दगड घातले

Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये नशेखोर तरूणाचा राडा, चौघांच्या डोक्यात दगड घातले

औरंगाबादमध्ये सिडको भागात एका नशेखोर तरुणाने राडा केल्याने गोंधळ उडाला होता. नशेच्या धुंदीत नशेखोराने दोन महिला आणि दोन मुलांना दगडाने मारून जबर जखमी केले. (Aurangabad crime)

औरंगाबादमध्ये सिडको भागात एका नशेखोर तरुणाने राडा केल्याने गोंधळ उडाला होता. नशेच्या धुंदीत नशेखोराने दोन महिला आणि दोन मुलांना दगडाने मारून जबर जखमी केले. (Aurangabad crime)

औरंगाबादमध्ये सिडको भागात एका नशेखोर तरुणाने राडा केल्याने गोंधळ उडाला होता. नशेच्या धुंदीत नशेखोराने दोन महिला आणि दोन मुलांना दगडाने मारून जबर जखमी केले. (Aurangabad crime)

  • Published by:  Sandeep Shirguppe

औरंगाबाद 21 सप्टेंबर : औरंगाबादमध्ये सिडको भागात एका नशेखोर तरुणाने राडा केल्याने गोंधळ उडाला होता. नशेच्या धुंदीत नशेखोराने दोन महिला आणि दोन मुलांना दगडाने मारून जबर जखमी केले. काही काळ सिडको भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान नशेखाराला पोलिसांच्या मदतीने नागरिकांनी मिळून तरुणाला जेरबंद केले. यावेळी संतप्त जमावाने तरुणाला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गाडीत घालून पोलीस ठाण्यात आणत पुढील कारवाई केली.

दरम्यान त्या व्यक्तीला व्यक्तीला वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या समोर नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. ही काल (दि.20) संध्याकाळच्या सुमारास घडली. त्याचवेळी सिडको पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मद्यधुंद व्यक्तीला ताब्यात घेत ठाण्यात आणले. त्याच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.

हे ही वाचा : Aurangabad : सणासुदीच्या काळात भाडेवाढ; रिक्षात बसताच मोजावे लागणार 26 रूपये

उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोच्या कार्यालयाच्या समोर राजु जाधव (रा. राजनगर, मुकुंदवाडी) हा रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांसह महिलांना दगडाने मारहाण करीत होता. वर्षा डोंगरे या महिलेला एन १ चौकात मद्यधुंद जाधव याने बेदम मारहाण केली. त्यानंतर तो तेथून सिडको उड्डाणपुलाच्या दिशेने पळत आला. येताना नागरिकांवर दगड फेकत होता. त्यात काही जणांना किरकोळ लागले होते. तो पळून जात असतानाच नागरिकांनी वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या जवळ त्यास पकडण्यात आले.

औरंगाबादमध्ये बिल्डरसोबत घडलं भयानक कृत्य

कामावरुन काढल्याच्या रागातून पुण्यात मालकिणीवर पेट्रोल टाकून तिची हत्या करण्यात आली होती. याचप्रकारची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. कामावरुन कमी केल्याच्या रागातून कामगाराने बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यात आडवून बेदम मारहाण केली. तसेच बिल्डरच्या खिशातील 15 हजार रुपये हिसकावून पोबारा केला.

हे ही वाचा : संतापजनक! अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकले, जव्हारमधील घटना

अरुण वाघमारे, असे यातील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कैलास नानासाहेब पवार (56, रा.जाधववाडी, सिडको) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे अरुण वाघमारे हा कामाला होता. त्याला काही महिन्यांपूर्वी कामावरुन काढून टाकण्यात आले होते.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime, Crime news

पुढील बातम्या