मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Aurangabad Court : सासरच्यांनी सुनेला काम सांगणे क्रौर्याचे नाही, औरंगाबाद खंडपीठाचा निर्वाळा

Aurangabad Court : सासरच्यांनी सुनेला काम सांगणे क्रौर्याचे नाही, औरंगाबाद खंडपीठाचा निर्वाळा

नांदेडमध्ये याचकारणावरून सुनेने सासू, ननंद आणि नवऱ्याला कोर्टात खेचलं होतं. यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याबाबत खटला सुरू होता.

नांदेडमध्ये याचकारणावरून सुनेने सासू, ननंद आणि नवऱ्याला कोर्टात खेचलं होतं. यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याबाबत खटला सुरू होता.

नांदेडमध्ये याचकारणावरून सुनेने सासू, ननंद आणि नवऱ्याला कोर्टात खेचलं होतं. यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याबाबत खटला सुरू होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

औरंगाबाद, 29 ऑक्टोबर : कामावरून सासू आणि सुनेचे भांडण होत असते हे जवळपास प्रत्येकाच्या घरी कमी जास्त प्रमाणात सुरू असते. कधी नवऱ्याकडून पत्निला काम सांगितलं म्हणून वाद होत असतो कधी सासूने सुनेला काम सांगितलं म्हणून वाद होत असतो. दरम्यान नांदेडमध्ये याचकारणावरून सुनेने सासू, ननंद आणि नवऱ्याला कोर्टात खेचलं होतं. यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत खटला सुरू होता. यावर सासू आणि सुनेच्या भांडणातून औरंगाबाद खंडपिठाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

लग्नानंतर पत्निला घरातील कामे सांगणे हा गुन्हा किंवा क्रौऱ्याचा भाग होत नसल्याचे स्पष्ट सांगितलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी हा निकाल दिला आहे.

हे ही वाचा : #कायद्याचंबोला : जर तुमच्या प्रॉपर्टीवर कोणी बेकायदेशीर ताबा मिळवला तर लगेच परत कशी मिळवायची?

याबाबत नांदेड पोलिसांत पती, सासू आणि ननंदेविरोधात नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादीवरून पती सारंग दिवाकर आमले, सासू सरोज दिवाकर आमले, आणि नणंद दीप्ती आशुतोष आठल्ये यांच्याविरुद्ध नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात कलम 498(अ), 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा  दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सारंग यांच्यासह तिघांनी गुन्हा रद्द करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाकडे मागणी केली होती.

दरम्यान यावर औरंगाबाद खंडपीठाने सारंग दिवाकर आमले यांच्या बाजूने निकाल दिला. तसेच नांदेड पोलीस ठाण्यात पती, सासू आणि ननंदेच्या विरोधात असलेली कलमेही रद्द करण्यास सांगितले आहे. नांदेडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समोर सुरू असलेली प्रकरणाची कार्यवाही खंडपीठाच्या निर्णयामुळे स्थगित होणार आहे.

काय आहे कोर्टाचा आदेश

आपल्याकडून माेलकरणीप्रमाणे काम करून घेतले जाते, हे एक प्रकारचे क्रौर्य असल्याची सृष्टी आमले यांनी तक्रार केली होती. यावर कोर्टाने स्पष्ट केले की, विवाहित स्त्रीला घरकामासंबंधी विचारणा केली असेल तर ती कुटुंबाच्या उद्देशानेच केली जाते, असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यातून संबंधित स्त्रीला मोलकरीण समजणे असा अर्थ होत नाही.

हे ही वाचा : #कायद्याचं बोला: ऑनलाईन मागवलेला TV रिप्लेस करण्यास कंपनीची चालढकल! पुण्याच्या तरुणीने एका कॉलने आणलं वठणीवर

जर विवाहितेला घरकाम करायचे नसेल तर तिने विवाहापूर्वीच सांगणे गरजेचे असून अशी अडचण त्यातून दूर झाली असती, असेही नमूद केले. पत्नीने सासरच्या विरोधात दिलेल्या तक्रारीत चारचाकी वाहन खरेदीसाठी चार लाख मागितल्याचा तसेच पतीकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे म्हटले होते.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Mumbai high court